India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon

#India Alliance: इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसंदर्भात जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार- शरद पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Sharad Pawar | India Alliance: इंडिया आघाडी( India Alliance ) लोकसभा निवडणुकीसंदर्भात (Loksabha Election) जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार आहे. ज्या ठिकाणी वाद असेल त्या ठिकाणी एक-दोन लोकांनी एकत्र बसून मार्ग काढावा, असे शनिवारी (दि. १३) मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीच्या(( India Alliance ) ऑनलाइन झालेल्या बैठकीमध्य ठरल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सांगितले. दरम्यान, देशात इंडिया आघाडी चांगल्या प्रकारे पर्याय देऊ शकते याबाबत आमचे सगळ्यांचे एकमत झाला असल्याचे त्यांनी सांगितले. (India Aghadi will take a decision on seat allocation regarding the Lok Sabha elections soon)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर एका कार्यक्रमानिमित्त आले असता शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, दिल्ली येथे शनिवारी (दि. १३) मल्लिकार्जुन खर्ग यांच्या अध्यक्षतेखाली इंडिया आघाडीची (India Alliance) बैठक पार पडली या बैठकीला सोनिया गांधी(Sonia Gandhi), राहुल गांधी(Rahul Gandhi)  आदीसह इंडिया आघाडीचे सर्वच नेते उपस्थित होते.  बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे प्रमुखपद मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge)  यांनी  घ्यावे तसेच आपण सगळ्यांनी एका विचाराने लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे अशी चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचे सांगत इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकी संदर्भात जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

इंडिया आघाडीचे नेतृत्व मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्विकारावं अशी सूचना काही सहकार्यांनी केली, त्याला अनेकांनी संमती दिली. त्याचप्रमाणे संयोजक म्हणून नितीश कुमारांनी जबाबदारी घ्यावी अशी सूचना करण्यात आली होती. परंतु, संयोजक पदाची गरज नसल्याचं मत नितीश कुमारांनी मांडलं. त्यामुळे संयोजक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाचा तरी एकाचा चेहरा पुढे करून मत मागण्याची गरज नाही आगामी काळामध्ये व्यूहरचना करण्यासाठी एक कमिटी गठीत करावी असे या बैठकीत ठरल्याचं त्यांनी सांगितले. सध्याचे केंद्र सरकारचे धोरण ज्या मंडळींना मान्य नाही, असे सगळे पक्ष एकत्र आले आहेत.  इंडिया आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची कोणत्याही पक्षाची नाराजी नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.  

सन १९७७ ला होती अशीच परिस्थिती

सन १९७७ मध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. विरोधकांनी एकत्र येऊन त्याती सत्ता मिळवली आणि ऐनवेळी मोरारजी देसाई यांना सगळ्यांच्या विचाराने पंतप्रधान केले गेले. आताही  तशीच परिस्थिती असून नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून इंडिया आघाडी सक्षमपणे काम करीत आहे. देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकारच येईल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले असताना शेतकऱ्यांसदर्भात काही चांगले निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा होती. मोदी आपल्या संदर्भामध्ये काहीतरी धोरणात्मक योग्य निर्णय घेतील, असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनावाटत होते. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी तसे काही केलं नाही. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन शेतक-यांच्या भावनांचा आदर केला असं मात्र आम्हाला कुठे दिसले नाही, असेही पवार म्हणाले.

पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही

शरद पवार म्हणाले की, घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी,असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पण  घराणेशाही म्हणजे नेमकं काय? डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली? त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही. त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं, असे शरद पवार म्हणाले,

मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, पण… : शरद पवार

अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही पण मी जाणार, मात्र २२ जानेवारीला नाही जाणार नंतर नक्की जाईन. श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसेच अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात वाढ केलेली आहे. दहा हजारांचे तिकीट चाळीस हजार करण्यात आलेत. विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेला नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील, असेही शरद पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *