स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची :भाग – ५ : साधू, संन्यासी व बैराग्यांची नगरी – अयोध्या 

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Shriram Temple : साधुसंतांची नगरी (City of Saints) म्हणून अयोध्या नगरी (Ayodhya City) ओळखली जाते. किमान दोन हजार वर्षांच्या इतिहासात अयोध्या व परिसरातील साधू व संन्याशांच्या मठांचे अनेक उल्लेख सर्व प्रकारच्या साहित्यात आढळतात. भारतात जेवढे पंथ आहेत त्या बहुतेक सर्व पंथ – उपपंथांचे मठ म्हणजेच आखाडे तिथे आहेत. अयोध्येच्या लोकसंख्येत जवळपास निम्मा वाटा या साधू – संन्याशांचा असतो.

साधू, संन्यासी, बैरागी हे शद्ब आपण जवळपास समान अर्थाने वापरत असलो तरी साधू, संन्याशी व बैरागी हा प्रत्येक वर्ग वेगळा आहे. कारण वेगवेगळ्या पंथांच्या त्यांना मान्यता असतात. एका अभ्यासानुसार भारतात ६६ पंथ व उपपंथ आहेत आणि बहुतेक या सर्वांचे मठ अयोध्येत आहेत.

अधिक वाचा  सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ जेरबंद

अयोध्या हे रामभक्तीचे केंद्र असल्यामुळे या परिसरात स्वाभाविकच राम संप्रदाय व वैष्णव पंथीय मठांची संख्या मोठी आहे. रामानंदी संप्रदायाशी जोडलेले अनेक मठ अयोध्येत आहेत, त्या खालोखाल शैव, नाथ, शाक्तपंथीय मठ तसेच कोणत्याही मठाशी न जोडलेले साधूंचे मठ, जैन व बौद्ध धर्मिय मठ तसेच शीख धर्मियांची गुरुद्वारे अयोध्येत आहेत. अयोध्येत एकूण ३००० पेक्षा अधिक मंदिरे व मठ आहेत.

येथील मठांना किंवा आश्रमांना आखाडा – निर्मोही आखाडा, निर्वाणी आखाडा, छावणी – बाबा मणिराम छावणी, बडी छावणी असे म्हटले जाते. मंदिरांना सुद्धा गढी – हनुमान गढी, किला – लक्ष्मण किला, अंगद किला असे म्हणण्याची पद्धत आहे. या सगळ्या साधूंच्या प्रकारांमध्ये लष्करी साधू असा स्वतंत्र प्रकार आहे. हे साधू लढवय्ये असतात, सर्व प्रकारची शस्त्रे चालवण्यामध्ये ते पारंगत असतात. विशेषतः नागा साधूंचा विशेष दरारा असल्याचे दिसून येते.

अधिक वाचा  मंजुषा कंवर यांना मेजर ध्‍यानचंद पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल इंडियन ऑइलने केले सन्‍मानित

रामजन्मभूमी मुक्तीच्या संघर्षात या साधु-संतांनी सर्व प्रकाराने लढे दिले आहेत. सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या हुकुमाने फिदाई खान राम मंदिर पाडण्यासाठी अयोध्येत आल्यानंतर त्याचा प्रतिकार चिमटाधारी साधू आणि निहंग शिखांनी मिळून केला होता. पुढच्या काळात वाजिद अली शहाविरुद्ध इ. स. १८५५ मध्ये हनुमान गढी व रामजन्मभूमीसाठी झालेली लढाई साधुंनीच केली होती. इ. स. १८८५ साली राम मंदिर बांधण्याची परवानगी मिळावी म्हणून न्यायालयाचा दरवाजा सर्वात प्रथम ठोठावणारे रघुबर दास हे एक महंतच होते. पुढच्या काळात रामजन्मभूमी मुक्तीसाठी आंदोलन सुरू ठेवण्यामध्ये करपात्रीजी महाराज, महंत दिग्विजयनाथ, बाबा राघवदास अशा साधु-संतांनीच पुढाकार घेतला होता. इ. स. १९४९ मध्ये गर्भगृहात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना करणारेही साधू – बैरागीच होते. इ. स. १९५० सालापासून २०१९ पर्यंत चाललेली न्यायालयीन लढाई लढण्यातही साधू-संत आघाडीवर होते. इ.स. १९९० व १९९२ या दोन्ही वर्षांच्या कारसेवांमध्ये साधुसंतांचा व त्यांच्या छावण्यांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे रामजन्मभूमीसाठी संघर्ष करताना सर्व पंथोपंथांचे साधू, संन्याशी व बैरागी नेहमीच एकवटलेले होते व त्यांच्या अथक प्रयत्नातूनच रामजन्मभूमी मुक्त झाल्याचे लक्षात येते.

अधिक वाचा  रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये -पंकजा मुंडे

डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love