स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग- ११ : शाह गुलाम हुसेन याचा हनुमानगढीवर हल्ला

Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.
Congress leader first called for the liberation of Ayodhya, Kashi and Mathura in 1983.

Hanumangarhi | Shah Ghulam Hussain :  अवध(Avadh)म्हणजेच अयोध्येवर(Ayodhya) वाजिद अली शाह(Wajid Ali Shah) सत्तेवर असताना फेब्रुवारी १८५५ मध्ये एक सुन्नी पुढारी शाह गुलाम हुसेन (Shah Ghulam Hussain) याने हनुमानगढी मंदिर( Hanumangarhi Temple)  हे मशीद (Mosque)  पाडून बांधलेले आहे अशी अफवा पसरवून हनुमानगढीवर (Hanumangarhi) हल्ला केला. परंतु हुसेनच्या विरुद्ध तेथील बैरागी( Bairagi) संघटित झाले व त्यांनी तेथून शाह गुलाम हुसेन( Shah Ghulam Hussain)याला पिटाळून लावले. (Attack on Hanumangarhi by Shah Ghulam Hussain)

आपला जीव वाचविण्यासाठी हनुमानगढीच्या शेजार असलेल्या जन्मस्थान मस्जिद असे म्हटले जाणाऱ्या रामजन्मभूमीत (BirthPlace Of Ram) हुसेनने आश्रय घेतला. परंतु बैराग्यांनी तेथेही चढाई केली व ती जागा देखील ताब्यात घेतली. या लढाईत ७५ मुस्लिम व १२ हिंदू मारले गेले. हिंदू बैराग्यांच्या बाजूने अयोध्येच्या आसपासचे लहान-मोठे जमीनदार आणि राजा बख्तावर सिंग, राजा मानसिंग यांची कुमक उभी राहिली. अवधवर राज्य करणाऱ्या वाजिद अली शहाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली व त्याचे सैन्य हा संघर्ष पाहत बाजूला उभे राहिले. पुढच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य पुढे आले व त्यांनी रामजन्मभूमी मोकळी करून घेतली, परंतु हा संघर्ष मात्र सुरूच राहिला.

अधिक वाचा  स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची : भाग – ४ : जैन आणि बौद्ध परंपरेत अयोध्येचे महत्व

डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

 मोबाईल फोन क्र. : ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love