कोणी कोणाचे ऐकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे- शरद पवार

आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी
आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी

Sharad Pawar On Ajit Pawar -देशात लोकशाही असून बारामती (Baramati) मधील अनेक संस्थात मी काम केले आहे. त्यामुळे कोणी कोणत्या पदावर जावे याबाबत माझ्याशी चर्चा केली जाते. मी नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी घेतली आहे. १० ते १५ वर्ष मी बारामतीत लक्ष्य घातलेले नाही. युवा पिढीसमोर यावी, सर्वांना सहभागी करुन घ्यावे त्यामुळे माझे याबाबत काही दुमत नाही. कोणी कोणाचे ऐकावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.  (Who should listen to whom is his question)

इथून पुढं फक्त माझे ऐका. बाकी कुणाचं ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्षे झालं ऐकलं आहे. आता माझे ऐका, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केलं होतं. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अधिक वाचा  तर ...पुढचा मुख्यमंत्री मीच असेन : रामदास आठवले

पवार म्हणाले, आमच्या  काळात आम्ही बंड केले नव्हते, एकत्रित बसून निर्णय घ्यायचो. तो परिस्थिती आधारे घेतलेला एक निर्णय होता. “यशवंतराव चव्हाण (Yashvantrao Chavan) त्यावेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊनच निर्णय घेतला. त्यासंबंधी आज तक्रार करण्याचे काही कारण नाही. आज कुणी काही केले त्याचीही मला तक्रार करायची नाही,” असं शरद पवारांनी सांगितलं. आज ज्यांनी अशाप्रकारे वेगळा निर्णय घेतला त्याबाबत देखील माझा आक्षेप नाही. केवळ त्यांनी पक्षावर हक्क सांगू नये असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी  पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

पवार म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही राज्यात भाजपने कोणाला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केले नाही. निकालानंतर तीन राज्यात त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला आहे. निवडणुकीत कोणाला निवडून आणायचे याबाबत लोक स्वत: निर्णय घेत असतात. लोकांना ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी ते त्यांना अपेक्षित बदलाचा निर्णय घेत असतात. सर्व्हे कधी खरे ठरतात कधी ठरत नाही. सर्व्हे केवळ संकेत देत असतात. तिथवर ठिक असते असे मत त्यांनी नुकत्याच महाविकास आघाडीला कौल दाखविणाऱ्या सर्व्हेवर यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा  कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा - अजित पवार

पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत सहभागी करुन घ्यावे अशी आमची देखील मागणी आहे. याबाबत इंडिया आघाडीतील पक्षाशी बोलणे सुरु आहे. खासदार अमोल कोल्हे  यांचेवर अजित पवारांनी केलेल्या टिकवेर ते म्हणाले, मी संसदेत काम करताना खासदार अमोल कोल्हे हे काम करताना दिसतात. त्यांच्याशी चर्चा करताना,त्यांना काही व्यैक्तिक अडचणी जाणवून घेतो.

इथेनॉल बाबत केंद्र सरकारशी चर्चा

इथेनॉल संर्दभात केंद्र सरकारने घेतलेला निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम करणारा आहे. देशात वाहने मोठया प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे इंधन अधिक प्रमाणात लागते. इथेनॉलचा वापर केल्याने आयात इंधन कम होऊन देशाचे पैसे वाचतात. इथेनॉल धोरणाबाबत अनेक वर्ष आम्ही केले. केंद्र सरकारशी सुसंवाद साधून पंतप्रधान, सहकारमंत्री यांच्याशी बोलणे करुन इथेनॉल निर्मीती बाबत मार्ग काढण्यात येत आहे.

अधिक वाचा  देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या कॉंग्रेसच्या  षडयंत्रात 'उबाठा' ही सहभागी - माधव भांडारी यांचा हल्लाबोल

निर्णय घेण्यास उशीर

राष्ट्रीय कुस्ती संघ पदाधिकारी निवडबाबत आक्षेप असताना, महिला कुस्तीपटूंनी टिका करत खासदार ब्रिजभूषण सिंह यांचेवर आरोप  केले. त्यानंतर केंद्र सरकारचे क्रिडा विभागातर्फे नवीन निवडलेली राष्ट्रीय कुस्ती संघ समिती रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला याबाबत शरद पवार म्हणाले, हा निर्णय घेण्यास केंद्र सरकारला उशीर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशातील मुलींनी जे कृर्तत्व दाखवले त्यांच्या संर्दभात जी भूमिका घेतली गेली ती दुर्देवी आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकर घेणे आवश्यक होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love