गुरूपूजन व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


पिंपरी(प्रतिनिधी)–जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या (Arvind Education Society) लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, (Little Flower english Medium School) भारतीय विद्यानिकेतन विद्यालय (Bhartiya Vidyaniketan) आणि अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन (Gurupujan) व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा(Gurupornima) उत्साहात साजरी करण्यात आली.

सरस्वती व व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, संगीता घाटगे, शिक्षिका सुनिता ठाकुर, अमृता अमोलिक, नीलम सावंत, सीमा हवालदार, स्वप्ना जानूनकर, ममता पवार, स्वाती तोडकर, बिसमिल्ला मुल्ला, संजीवनी बडे, अश्विनी शिंदे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

अधिक वाचा  साठ वर्षांच्या काळात कॉँग्रेसने ८० वेळा घटनेची मोडतोड करण्याचं पाप केलं- नितीन गडकरी : मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्याचे आवाहन

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरूजनांचे व  आई-वडिलांचे मोठ्या सन्मानाने पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुचे महत्त्व मनमोहक नृत्याच्या स्वरूपात सादर केले. तर ‘एकलव्यची गुरुदक्षिणा’ या नाटिकेच्या सादरीकरणातून दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरु प्रती आदर व्यक्त केला. नववीच्या विद्यार्थीनींनी ‘गुरू ब्रम्हा गुरू विष्णू’ या गाण्यावर नृत्य केले. तसेच ‘भेटला विठ्ठल माझा’ या गाण्यातून गुरूवंदना दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी पालकांचे गुरुमंत्राच्या संगीतमय वातावरणात पाद्यपूजन करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

आरती राव म्हणाल्या, की व्यक्तीच्या आयुष्यात गुरुचे स्थान खूप उच्च दर्जाचे व महत्त्वाचे असते. तसेच विद्यार्थ्यांसाठी मोबाईल, लॅपटॉप जे कोरोना काळात गुरू इतकेच महत्त्वाचे ठरले, म्हणजे ते विद्यार्थ्यांचे स्मार्ट गुरु झाले. यांचे देखील पूजन करून कृतज्ञता व्यक्त केले. प्रणव राव यांनी प्रथम गुरु आपले आई – वडील म्हणून त्यांचा नेहमीच मान राखला पाहिजे, असे आवाहन केले. शिक्षिका स्वाती तोडकर यांनी विद्यार्थ्यांकडून गुरूविषयी महत्त्व सांगणारी प्रतिज्ञा म्हणून घेतली. शिक्षिका संजीवनी बडे व अश्विनी शिंदे यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.     

अधिक वाचा  तेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर

आपल्या आयुष्यामध्ये आई- वडील, शिक्षक हे आपले गुरु आहेत. त्याचप्रमाणे निसर्ग हा देखील आपला मोठा गुरु आहे. योग्य रस्ता दाखविण्याचे काम गुरु करीत असतात, अशा शब्दात मुख्याध्यापिका नीलम पवार, आशा घोरपडे, प्राचार्य शीतल मोरे यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मराठी, हिंदी या दोन्ही भाषेतील हस्ताक्षर स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले. स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका बिसमिल्ला मुल्ला यांनी केले.

शिक्षिका प्रिती पितळे, उज्ज्वला दरेकर व हर्षला  गायकवाड, तन्वी मोहिते यांनी सूत्रसंचालन, तर आभार शिक्षिका दीपा गायकवाड व नीलम सावंत यांनी मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love