पुणे – गुरुपूजन (Gurupujan) ही आपली संस्कृती आहे. केवळ पुण्याचे नव्हे तर आपल्या देशाचे नावलौकिक वाढवणाऱ्या आणि आयुष्यभर व्रतस्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान करण्याची संधी मला शिक्षणमंत्री या नात्याने मिळाली, याबद्दल खूप कृतार्थ वाटते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Economic Policy) अंमलबजावणीमध्ये आता शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी आज येथे व्यक्त केले. (the award will be start in the name of j p naik for professor)
ख्यातनाम शिक्षणतज्ञ पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक ( Educationist Padma Bhushan Dr. J. P. Naik) यांच्या नावाने उच्चशिक्षण विभागाच्या वतीने प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार यंदापासून सुरू करणार असल्याची घोषणाही यावेळी पाटील यांनी केली. पुननिर्माण सोशल फाउंडेशन आणि विद्याप्रबोधिनीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, विविध व्यक्तिमत्त्वांचा परिचय समाजाला होण्यासाठी राजकीय हस्तक्षेप नसलेल्या कार्यक्रमांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. समाजात विविध क्षेत्रात अनेक व्यक्तिमत्वे कार्यरत आहेत त्यांचा परिचय समाजाला होण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, त्यांचे पूजन केले पहिजे, कारण त्यांनी आयुष्यभर एक मिशन म्हणून काम केले आहे. अनेकांना मार्गदर्शन, दिशा दिली आहे, अशा व्यक्तिमत्वांचा गौरव झाला पाहिजे.
जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून डॉ. जे. पी. नाईक यांचे नावे पुरस्कार सुरू करण्याची मागणी यावेळी केली. या कार्यक्रमांमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, सिम्बायोसिसचे संस्थापक प्रद्मविभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार, समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर (निवृत्त), एअरमार्शल प्रदीप बापट, प्रख्यात मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅनो शास्त्रज्ञ व माजी उपकुलगुरू डॉ. सुलभा कुलकर्णी, संत साहित्याचे भाष्यकार प्रा. डॉ. अशोक कामत, नामवंत गिर्यारोहक उष:प्रभा पागे, भास्कराचार्य प्रतिष्ठानचे गणितज्ञ प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी, कृषीतज्ञ डॉ. दत्तात्रय बापट आणि ह. भ. प. मोरेश्वरबुवा जोशी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक भालचंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले. अनिरुद्ध एडके यांनी सूत्रसंचालन केले तर वैशाली जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.