MD Narcotics seized-पुणे पोलिसांनी(Pune Police) अमली पदार्थ विरोधी कारवाई मध्ये आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट( Drug trafficking racket)उघडकीस आणले आहे .पुणे जिल्ह्यातील दौंड(Daund) येथील कुरकुंभ(Kurkumbh) औद्योगिक परिसरात अर्थ केम लॅबोरेटरी(Earth Chem Laboratory) या एमडी अमली पदार्थ बनवणाऱ्या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाई मध्ये तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो एमडी अमली पदार्थ जप्त(MD Narcotics seized) केले आहे.
पुणे पोलीस आयुक्त(Pune Police Commissioner) अमितेश कुमार(Amitesh Kumar) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे उपस्थित होते. मेफेड्रोन निर्मिती, तसेच विक्री प्रकरणाचे धागेदोरे देशभरात पसरल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सोमवारी पुणे पोलिसांनी पुण्यातल्या विश्रांतवाडी येथून १०० कोटींपेक्षा अधिक एमडी ड्रग्स ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली होती. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी), असं ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपींची नाव होती. हे मिठांच्या पुड्यांमध्ये भरून ड्रग्स विक्री करत होते. त्यांची कसून तपासणी केली असताना दौंड येथील फॅक्टरीची माहिती मिळाली.त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. शेखने विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात मेफेड्रोन लपविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. विश्रांतवाडीतील गोदामातून ५५ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
आरोपी माने, शेख, करोसिया यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीतून मेफेड्रोन तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून ११०० कोटी रुपयांचे ६०० किलो मेफेड्रोन जप्त केले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.