साहित्य संगोष्टी शब्दसंवाद: स्नेहमेळावा संपन्न


पुणे – संस्कारभारती पुणे महानगर साहित्य विधेतर्फे ‘व्हाटसअॅप’वर ‘साहित्य संगोष्टी-लिहिते व्हा ,बोलते व्हा’ उपक्रम सुरू झाला आणि त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणता म्हणता ५० भाग पूर्णही झाले. या ग्रुपवर ‘लिहिते व्हा’ म्हणत सर्वजण लिहून शब्द संवाद करत होते आणि त्यातूनच अक्षरांच्या धाग्याने सगळे एकमेकांशी बांधले गेले.  हे सर्व सुरू असताना प्रत्येकाच्या मनात  प्रत्यक्ष भेटीची ओढ निर्माण झाली आणि त्यातूनच सुवर्णमहोत्सवी भाग ‘बोलते व्हा’ प्रत्यक्ष भेटीतून साजरा करण्याचे ठरले. ८ मे रोजी भावे प्राथमिक शाळा येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विचारवंत,लेखक, साहित्यिक यांच्या उपस्थितीत हा स्नेहमेळावा संपन्न झाला.

डॉ मंदा खांडगे यांनी बीजभाषणात लहानपणापासूनच पुस्तकं हातात आली पाहिजेत सांगत  वाचन,पुस्तकं,उत्तम साहित्य सर्वांगीण विकासाला कशी पूरक असतात हे सांगितलं. स्वाती  महाळंक ,डॉ विजया देव आणि मधुसूदन पत्की यांनी  व्यक्तिमत्व घडणीत पुस्तकांचा खूप मोठा वाटा असतो हे ‘पुस्तकं आम्हाला घडवतात’ या परिसंवादातून पटवून दिले.

अधिक वाचा  मुरलीधर मोहोळ यांना 27 हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा

राजश्री सोले आणि प्रभा सोनवणे यांनी वृत्तबद्ध काव्यप्रवास उलगडून दाखवला. प्रश्नमंजुषा आणि शब्दखेळ घेऊन श्रीकांत वाघ यांनी  सर्वांना सहभागी करून घेत मजा आणली.

‘ग्रंथसंपदा असावी घरोघरी’ याचा वस्तुपाठ देणारे प्रसाद भडसावळे यांना अमृता खाकुर्डीकर यांनी बोलतं  करून त्यांच्या अनुभवाची शिदोरी  मोकळी केली.

विनया देसाई यांनी  समारोप करताना पुस्तकरुपी सरस्वतीला वंदून मातृदिन असाही साजरा होतो असं व्यक्त करून संमेलनावर कळस चढवला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष पं. डॉ. केशव गिंडे, सचिव विनायक माने, साहित्य विधा प्रमुख माधुरी जोशी, सहसचिव धनश्री देवी, नितीन क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love