युग पुरुष दत्तोपंत ठेंगडी

पुणे-मुंबई
Spread the love

10 नोव्हेंबर 1920 ला दत्त जयंतीच्या दिवशी आर्वी जिल्हा वर्धा येथे दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म झाला.आज दत्तोपंत जीवित असते तर 101 वर्षाचे राहिले असते.गतवर्षी दत्तोपंत ठेंगडी जन्म शताब्दी समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या समितीच्या अध्यक्षा माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन होत्या.प्रमुख कार्यक्रम नागपूर येथे दिनांक 10 नोव्हेंबर 2020 ला आयोजित करण्यात आला. परमपूज्य मोहनजी भागवत प्रमुख वक्ता होते.हा कार्यक्रम अविस्मरणीय असाच होता.सामाजिक,राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली.त्यात प्रामुख्याने राष्ट्र सेविका समितीच्या संचालिका शंतक्का,पूर्व संचालिका प्रमिलाताई मेढे, डॉ. मुरलीमनोहर जोशी, भा. म. संघाचे ब्रिजेश उपाध्याय, बी.सुरेंद्र किसान संघाचे दिनेश कुलकर्णी आदि मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारत सरकारने दत्तोपंत यांच्या 101व्या जन्मदिनी टपाल तिकीट काढून त्यांचा यथोचित सत्कार केला आहे.या पूर्वी देखील भारत सरकारने त्यांना पदंभूषण हा किताब देऊन गौरव करण्याचा प्रयत्न केला.पण दत्तोपंतांनी हा किताब स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.त्यांनी दिलेले कारण देखील संयुक्तिक होते.आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर यांना जो पर्यंत भारत रत्न किताब देऊन गौरणंनवित केले जात नाही तोपर्यंत मला कुठलाही किताब स्वीकारता येणार नाही ही त्यांची भूमिका होती.दत्तोपंत आज हयात असते तर गत 7 वर्षापासून केंद्र स्थानीं समविचारी सरकार असतांना यावर निर्णय होऊ नये याचे शल्य त्यांना बोचत राहिले असते.

दत्तोपंत एक असामान्य वक्तीमत्व होते.संघ शाखेच्या माध्यमातून त्यांचे बालमनावर सुयोग्य संस्कार झाले.नेतृत्वाचे बाळकडू त्यांना किशोर अवस्थेत मिळाले.वयाच्या 14 व्यां वर्षी ते वानर सेना आर्वी तालुकाचे अध्यक्ष झाले.विद्यार्थी संघाचे ते 1935-36 मध्ये पदाधिकारी होते.भा. म.संघ(१९५५), किसान संघ(१९७९),सामाजिक समरसता मंच(१९८३) सर्वपंथ समाचार मंच(१९९१),स्वदेशी जागरण मंच(१९९१) आदी संस्थांचे दत्तोपंत संस्थापक होते.१९६४ ते १९७६ पर्यंत ते राज्य सभा सदस्य होते.२३ जुलै १९५५ ला भोपाळ येथे निवडक ३५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय मजदुर संघाची स्थापना केली.तेंव्हापासून ते १४ ऑक्टोबर २००४ पर्यंत दत्तोपंत भा. म.संघाचे सर्वेसर्वा होते.

युरोप, साऊथ आफ्रिका, आशिया,अमेरिका खंडातील अनेक देशांचा प्रवास त्यांनी केला.विशेष म्हणजे दत्तोपंत पाकिस्तानला कधी गेले नाहीत. अतांगवात आणि मैत्री बरोबर नांदू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते.दत्तोपंत द्वारा लिखित मराठी,इंग्रजी,हिंदी,बंगाली आदी भाषेतील जवळपास १०४ पुस्तके कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता उपलब्ध आहेत.राष्ट्रीय श्रम निती ठरविण्यात दत्तोपंतांचे भरीव योगदान राहिले आहे.दत्तोपंत. भारतीय राजनीती,भारतीय अर्थव्यवस्था,औद्योगिक निती,समाज वेवस्था चे गाढे अभ्यासक होते.कार्यकर्ता हा संघटनेचा आत्मा आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.त्यामुळे स्तरावरील कार्यकर्त्यांना दत्तोपंत तळहातावरचे फोडाप्रमाणे जपत असत.आज त्यांची उणीव भासते ती त्यामुळे.

आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र आदरांजली.

वसंत पिंपळापुरे

नागपूर

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *