माजी आमदार विलास लांडे यांच्यासह अजितदादा गटाचे १६ नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर

विलास लांडे यांच्यासह अजितदादा गटाचे १६ नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर
विलास लांडे यांच्यासह अजितदादा गटाचे १६ नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर

पिंपरी(प्रतिनिधी)– माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अजितदादा गटाचे १६ नगरसेवक शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर माजी मंत्री रामकृष्ण मोरे यांच्यानंतर अजितदादांनी वर्चस्व प्रस्थापित केले. लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना पक्षात घेऊन भाजपाने दादांना चांगला शह दिला. तरीही दादांचा मानणारा एक गट अस्तित्वात राहिला. मात्र, लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या यशानंतर दादा गटात चलबिचल निर्माण झाल्याचे दिसत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दादा गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. गव्हाणे हे १६ नगरसेवकांसह लवकरच मेळाव्याच्या माध्यमातून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय माजी नगरसेवक विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राहुल भोसले, प्रवीण भालेकर, प्रदीप तापकीर, पंकज भालेकर, प्रकाश मस्के, संजय वाबळे, गणेश भोंडवे, संजय उदावंत हेही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. गव्हाणे हे पिंपरी-चिंचवडमधील मातब्बर नेते म्हणून परिचित आहेत. ते तीन टर्म नगरसेवक राहिले असून, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरात उल्लेखनीय काम केले आहे. याशिवाय माजी आमदार विलास लांडे हेही शरद पवार गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भोसरीतून उमेदवारी मिळविण्यासाठी शरद पवार गटात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. भोसरीवर ठाकरेसेनेचाही दावा आहे. पक्षाकडून सुलभा उबाळे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाच्या पारडय़ात पडते, हे पाहणेही महत्त्वाचे असेल. 

अधिक वाचा  पुण्यात 1 जूनपासून 'वीकेंड लॉकडाऊन' नाही -राजेश टोपे

भोसरी विधानसभेचे नेतृत्व भाजपाचे नेते महेश लांडगे हे करतात. लांडगे यांचे भोसरीत मोठे प्रस्थ आहे. त्यांना टक्कर देणे सोपे नसेल. हे पाहता नगर दक्षिणप्रमाणे येथे लंके पॅटर्न राबविता येऊ शकतो का, याची चाचपणी शरद पवार करीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भोसरीतील घडामोडींना आता वेग आला आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love