Supriya Sule vs Sunetra Pawar fight?

सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार? काय म्हणाले रोहित पवार?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)-सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार ही केवळ चर्चाच आहे ना? कुठल्या नेत्याने असे सांगितले आहे का? असा सवाल करत, तो निर्णय भाजपचा आहे, त्यामुळे तो निर्णय भाजप घेईल अथवा जे नेते भाजपबरोबर गेले आहेत ते याबाबतीतला निर्णय घेतील असे आमदार रोहित पवार यांनी पुण्यामध्ये प्रसार मध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यावर आम्ही काय बोलणार? असेही ते म्हणाले. (Supriya Sule vs Sunetra Pawar fight?)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी बॅनर लावण्यात आले होते. यावर सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार आणि संसदेचा फोटो असल्याचे पाहायला मिळाला. याशिवाय सुनेत्रा पवार यांना पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा असा संदेश यावर लिहिला होता. बारामती लोकसभा मतदार संघातील वारजे भागात हे बॅनर लागल्याने सुप्रिया सुळे यांना घरातूनच आव्हान मिळणार का? आणि सुप्रिया सुले विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत विचारले असता रोहित पवार यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, चर्चेवर चर्चा करीत आपण आपण आपला आणि लोकांचा वेळ कशाला वाया घालवायचा? असा प्रश्न करीत अशी परिस्थिती उद्भवलीच तर त्यावेळेस पवार निर्णय घेणार नाहीत तर त्यावेळी लोक निर्णय घेतील.  कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक निर्णय घेत असतात असे रोहित पवार म्हणाले.

भाजपला एवढेच पाहिजे होते की जे महाराष्ट्रातले जे मोठे राजकीय कुटुंब आहेत, ते फुटावेत.  त्यांच्यामध्ये आपापसात भांडण व्हावेत आणि त्याचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा व्हावा. काही प्रमाणात प्रमाणात त्यांना यश सुद्धा सुद्धा आले आहे.  पण, भाजप कुठेतरी कुठेतरी हे विसरून गेलेले आहे की, कुटुंब म्हणून असणारे नेतेच फक्त ताकद नसते तर लोकं ही महत्त्वपूर्ण ताकद असते. महाराष्ट्राच्या लोकांना हे माहिती आहे की, कोणाच्या मागे थांबायचे. त्यामुळेच शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात माणुसकीने, प्रेमाने आणि निष्ठेने प्रतिसाद मिळत असल्याचे बघायला मिळत आहे असे ते म्हणाले.

जेव्हा केव्हा लढत होईल ती ऑफिशियल होईल. पक्षासाठी आणि विचारांसाठी लढावेच लागते. परंतु तो जर-तरचा विषय आहे. एकदा अंतिम निर्णय होऊ द्या. माझ्या अंदाजाप्रमाणे पुढील दोन महिन्यांमध्ये काही अंदाज स्पष्ट होतील की कोण लढणार? असे सांगून रोहित पवार म्हणाले, लोकांना विश्वासात घेऊन आम्ही हा लढा लढत राहू.

सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाला मी जाऊ शकलो नाही.  परंतु, दुपारच्या सत्रामध्ये माझे आई, वडील आणि पत्नी  काकींना भेटण्यासाठी गेले होते. संध्याकाळी आत्या (सुप्रिया सुळे) आणि प्रतिभा आजी सुद्धा होत्या असे सांगत रोहित पवार म्हणाले, “विषय एवढाच आहे एवढाच आहे की, सुनेत्रा काकी राजकारणात नाहीत.  आणि त्यांनी कोणाच्याही बाबतीत किंवा कोणाच्याही विरोधात कुठलेही राजकीय वक्तव्य केलेले नाही.  मग ज्या व्यक्तीने स्वतः राजकारण केलेले नाही आणि ते सुद्धा साठाव्या वाढदिवसानिमित्त एखादा व्यक्तिगत कार्यक्रम ठेवला असेल तर महाराष्ट्राची परंपरा आहे की अशा वेळेस अशा वेळेस आपण गेले पाहिजे. त्यामुळे  अशावेळी जाणं ही आम्ही आमची जबाबदारी समजतो.

पवार साहेबांना मुंबईमध्ये बैठका होत्या. माझीही त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर बैठक होती. त्यामुळे मलाही जाता आले नाही. , परंतु मी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनेत्रा काकींना वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असे असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *