सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर:खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते.  ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे , ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *