महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार?जागावाटपही झालं निश्चित?


पुणे — राज्यातील महाविकास आघाडी पुढील निवडणुका एकत्र लढविणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी याबाबत सुतोवाच केले आहे. पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे असे त्यांनी म्हटले आहे. जागावाटपही निश्चित झालं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (23 जुलै) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली होती. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा  आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती: उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, संजय काकडे म्हणाले, “महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील ३ महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे.

“सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता त्याचं काय झालं?” असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला. तसेच आता आम्हाला सावध राहण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love