शिवसैनिकांच्या कचाट्यात तानाजी सावंतांऐवजी उदय सामंत कसे सापडले?


पुणे- बंडखोर आमदार उदय सामंत हे नियोजित रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने गेल्यामुळे ते अलगदपणे जाऊन शिवसैनिकांच्या तावडीत सापडल्याची माहिती पुढे आली आहे. उदय सामंत हे ठरलेल्या रस्त्याने गेले नसल्याच्या वृत्ताला पुणे पोलिसांकडूनही दुजोरा देण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हडपसरवरून कात्रजकडे येत असताना तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार होते. ताफ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हेदेखील होते. मात्र, बिबवेवाडीच्या मार्गावर न जाता ते कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रज चौकामध्ये आले. दरम्यान, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची कात्रज येथील सभा पार पडली. ही सभा संपल्यानंतरच सामंत यांचा ताफा कात्रज चौकात आला व तेथेच ते शिवसैनिकांच्या तावडीत सापडले व हल्ल्याचे लक्ष्य ठरले, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांकडूनही सामंत यांनी मार्ग बदलल्याच्या वृत्तास दुजोरा देण्यात येत आहे.

अधिक वाचा  लवकरच आमच्या विजयाचा तिसरा अंकही पार पडेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तानाजी सावंताऐवजी सामंत सापडले…

रत्नागिरीचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला झाला असला, तरी प्रत्यक्षात बंडखोरांनच्या गटातील आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न होता, चुकून उदय सामंत त्यात सापडले, असा दावाही केला जात आहे.

कोण आदित्य ठाकरे? सावंत यांच्या वक्तव्याने वातावरण तापले

तानाजी सावंत यांनी कोण आदित्य ठाकरे, तो तर साधा आमदार आहे, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे सावंत यांच्यावरच प्रामुख्याने रोष दिसत होता. त्याचा फटका सामंत यांना बसल्याचीही चर्चा आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love