अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात हा इतिहास – अजित पवार


पुणे-जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून राळेगण सिद्धी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. यावर  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत अण्णांच्या उपोषणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.  अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात. त्यांना चूका, अन्याय दिसला तर ते आंदोलन करतात. आजही आपण त्यांची भुमिका ऐकलेली आहे. अण्णा त्यांच्या भुमिकेवर ठाम राहातात हा इतिहास असल्याचे पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.  

दरम्यान, दिल्लीत २६ जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाबाबत बोलताना पवार म्हणाले, आंदोलक शांतपणे आंदोलन करत होते. आंदोलनाला गालबोट लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेलाय का? अशा शंकेला जागा निर्माण होते आहे.  याचा तपास केला पाहीजे.  मला खात्री आहे. मी स्वतः शेतकरी आहे. शेतकरी असे हिंसक होण्याचा विचार करत नाही. ते पुढेही हिंसक होणार नाहीत हा विश्वास आहे. आंदोलन बदनाम करण्याचा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करू नये. सध्या या कायद्यांना स्थगिती मिळालेली आहे. पण नेमकं सरकारच्या मनात काय आहे? 10 ते 12  चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या काय कारण असेल हे  तपासलं पाहीजे मात्र, राज्यात हे कायदे = लागू केला जाणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  अण्णा हजारेंचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणं ही बाब अनाकलनीय