मृद्गंधाचा वास अत्तरापेक्षाही सुंदर – उल्हास पवार


पुणे-उन्हामुळे तापलेल्या जमिनीवर पहिल्या पाऊसाच्या सरी कोसळल्यानंतर वातावरणात निर्माण झालेल्या मृद्गंधाचा वास कोणत्याही सुगंधी अत्तरापेक्षा सुंदर असतो. या मृद्गंधामुळे सगळीकडे  आशेचे वातावरण तयार होते व सुखाचे दिवस आता येतील ही भावना मनाला स्पर्श करते. या पार्श्वभूमिवर कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण यांचा ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्यसंग्रहामुळे केवळ मन आनंदाने फुलते एवढेच नव्हे तर निसर्गाचे संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाला होते अशी भावना ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांनी व्यक्त केली.

तनया–ईशा प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मृद्गंधा’ या निसर्गविषयक काव्य संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी तनया–ईशा प्रकाशनचे प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले ‘सध्या वाढत्या शहरीकरणामुळे बेसुमार जंगलतोड होत आहे. त्यातूनच ग्लोबल वॉर्मिंगचे संकट सर्वांनाच भोगावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर मृद्गंधा हा निसर्गविषयक महत्व वाढवणारा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.

अधिक वाचा  ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळास केला सादर : अहवालात नेमकं काय?

कवयित्री सौ. जयश्री घोलप चव्हाण म्हणाल्या कि वृक्ष, वेली, फुले, शेती, नदी, पक्षी, आकाश, वारा हा सारा निसर्ग असल्यामुळेच आपले जीवन समृद्ध होत असते. निसर्गाची नासाडी न करता निसर्गाचे संवर्धन व्हावे हिच भावना या काव्य संग्रहात प्रतिबिंबित होत आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन सागर बाबर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रुति तिवारी यांनी केले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love