भारतात लस कधी? प्रथम कोणाला?किती डोस घ्यावे लागतील?दुष्परिणाम काय? याबाबत काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री?

आरोग्य
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचा प्रादुर्भाव ही भारताची डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे कोरोनावर कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. लस नक्की कधी येणार आली तरी ती पहिल्यांदा कोणाला देणार? किती जणांना देणार? असे प्रश्नही यानिमित्ताने चर्चिले जात आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमादरम्यान काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी लसीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

ते म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकासाठी लस देण्याची तयारी सरकार करत आहे आणि त्यासाठी एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली गेली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2021 च्या जुलैपर्यंत देशातील 20-25 कोटी नागरिकांना कोरोना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.  सरकार 40-50 कोटी लसीचे डोस आणि त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा याची योजना तयार करण्यात सध्या व्यस्त आहे.   

डॉ.हर्ष वर्धन यांनी सांगितले की लस देण्याची योजना तयार केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाकडून एक फॉर्म तयार केला जात आहे.  ज्यामध्ये ही लस प्रथम कुणाला द्यायची याची माहिती राज्य भरेल.  त्यानुसार लस वाटप केले जाईल. ते म्हणाले की लसीची साठवण आणि वितरणाशी संबंधित आकडेवारीही राज्यांकडून मागविण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले.

कोणाला देणार प्रथम लस?

डॉ.हर्ष वर्धन म्हणाले की,  सर्वप्रथम कोविद-19 च्या व्यवस्थापनात व्यस्त असलेले आरोग्य कर्मचारी आहेत, त्यांना ही लस प्रथम दिली जाईल. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, आशा कामगार आणि सरकारी रुग्णालयांपासून खाजगी रुग्णालयांमधील सफाई कामगारांचा समावेश आहे.

 लसीचे किती डोस घ्यावे लागतील?

आरोग्यमंत्री म्हणाले की कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांना एकच डोस द्यावा लागला तर खूपच चांगले होईल. परंतु, कधीकधी लसीच्या एका डोसने जेवढी आवश्यक आहे तेवढी प्रतिकारशक्ती वाढत नाही. अशावेळी लसीचे दोन डोस द्यावे लागतात, जेणेकरून पुरेशी प्रतिकारशक्ती वाढेल.

लसीचे काय असतील दुष्परिणाम?

डॉ हर्ष वर्धन म्हणाले की लसीच्या सर्व चाचण्या विहित मानांकनानुसारच केली जातात. यामुळे सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु लसीच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणताही धोका नाही. रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीबाबत बोलताना ते म्हणाले की सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *