दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकास रंगेहाथ पकडले


पुणे–हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील करण्याची कारवाई न करण्यासाठी  महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला दोन लाख रुपयांची लाख स्वीकारताना रंगेहात पकडले. पिंपरी चिंचवड परिसरातील निगडी येथे ही कारवाई करण्यात आली.

नलिनी शंकर शिंदे असे लाचखोर महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. हॉस्पिटलमधील सोनोग्राफी सेंटर सील न करण्यासाठी ही लाच स्वीकारली जात होती. ६२ वर्षीय महिला डॉक्टरने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला यांचे निगडित हॉस्पिटल आहे. तर नलिनी शिंदे या सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला अत्याचार निवारण कक्षात काम करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास नलिनी शिंदे यांच्याकडे आहे. या गुन्ह्याच्या. तपासासाठीच त्या निगडी येथे आल्या होत्या.

अधिक वाचा  #हीट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाचे 'ब्लड सॅम्पल'च बदलले : ससूनच्या दोन डॉक्टरांना बेड्या

हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन सील न करण्यासाठी आणि गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हा सर्व व्यवहार दोन लाख रुपयात ठरला. मात्र लाच देणे मान्य नसल्याने संबंधित महिला डॉक्टरने लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती.

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता नलिनी शिंदे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिंदे यांना रंगेहात पकडण्यासाठी तक्रारदार महिलेच्या निगडी येथील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love