नवी दिल्ली: नितीश कुमार यांनी भाजपशी काडीमोड घेत राजदबरोबर (राष्ट्रीय जनता दल) युती करून आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी अचानक एनडीएला रामराम का ठोकला? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहे.
बिहारमधील या राजकीय भूकंपामागे गेल्या १२ वर्षातील एकच गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. ती म्हणजे नितीश कुमार हे २०१० पासून बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. याशिवाय ५ वर्षापासून त्यांनी केंद्राकडे बिहारसाठी स्पेशल पॅकेजची मागणी केली होती. पण मोदी सरकारने या दोन्ही मागण्यांकडे दुर्लक्ष केले. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडण्याच्या कारणांमध्ये ते देखील एक असू शकते अशी शक्यता राजकीय क्षेत्रात व्यक्त केली जात आहे.
२०१७ साली नितीश कुमार यांनी बिहारची परिस्थिती सुधारण्याचा दावा करत राजद साथ सोडली होती आणि भाजपला जवळ केले. तेव्हा कुमार यांनी केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी २.७५ लाख कोटी रुपयांच्या स्पेशल पॅकेजची मागणी केली होती. तेव्हा नितीश कुमार यांनी बिहार आणि बिहारच्या जनतेसाठी मला याचक म्हणून कोणाच्या दरवाज्यासमोर जावे लागले तर त्यात मला संकोच वाचणार नाही., असे विधान केले होते.
परंतु, ५ वर्षानंतर या पॅकेज संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. नितीश कुमार याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने दोघांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली तर दुसरीकडे भाजपने असा दावा केलाय की राज्यासाठी १.२५ लाख कोटींचे मोठे पॅकेज दिले गेले आहे. यामुळे नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्याचे बोलले जात आहे.
काय आहे भाजपशी काडीमोड घेण्यामागे खरे कारण?
दुसरीकडे मात्र, नितीशकुमार यांच्या भाजपशी काडीमोड घेण्याला हे कारण म्हणजे केवळ दिखावा असल्याचे आणि खरे कारण हे वेगळेच असल्याचे बोलले जात आहे.
नितीश कुमार तर सोडाचे परंतु बिहारमधील स्थानिक मोठे नेते सुध्दा धास्तावले आहेत आणि त्यात काही भाजप नेते सुध्दा आहेत, कारण सध्या तेथे दोन विषय खुप गरम आहेत. एक म्हणजे खराब रस्ते आणि दूसरा भ्रष्टाचार
नितीशकुमार यांच्यासाठी सर्वात मोठी आपत्ती गडकरींच्या कार्यालयातून बाहेर आली आहे. गडकरींनी बिहारला रस्ते आणि पूल बांधण्यासाठी संपूर्ण देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त पैसा दिला आहे, पण बिहारच्या सुलतान गंजमध्ये 1750 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल 28-29 एप्रिल रोजी कोसळला. गडकरींनी पूल कोसळल्याचा अहवाल मागितला तेव्हा त्यांना उत्तर मिळाले ‘पूल कोसळण्याचे कारण म्हणजे जोरदार वादळी वारा’! यानंतर गडकरींनी ते काम केले ज्यासाठी त्यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या विभागाकडून दिल्या गेलेल्या पैशाचा संपूर्ण हिशेब मागितला. आणि बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून बसलेल्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांविरोधात चौकशी सुरू केली, आणि तो तपास टाळण्यासाठी बिहारचे भाजप नेते आपल्या पक्षात सामील होतील, असे नितीश कुमारांना वरकरणी वाटत आहे.
बिहारमधील सर्वच पक्षांचे नेते भ्रष्टाचाराच्या बाबतीत एकसंध आहेत. बिहारच्या जनतेच्या हिताचा विचार न करता त्यात जातीयवादाची बीजे रोवून आपले स्थानिक सरकारही चालवतात. ही केंद्र सरकार समोरील दोन आव्हाने आहेत.
नितीश कुमार एनडीए तून बाहेर पडण्यामागे अजूनही दुसरा एक अँगल आहे. ते म्हणजे बिहार जमुई मध्ये सापडली गेलेली सोन्याची खान असल्याचेही बोलले जात आहे.
सरकारी आकडेवारीनुसार बिहारच्या जमुईमध्ये 222.885 दशलक्ष टन सुवर्ण धातू आहे, जे देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्याच्या 44 टक्के आहे. एवढा मोठा सोन्याचा साठा सापडल्या नंतर तेथील राजकारण्यांचा जीभेतून लाळ टपकत आहे आणि त्यामुळेच जास्तीत जास्त लूट कशी करता येईल ह्या हिशोबाने नितीश, लालू कुटुंब आणि स्वार्थी भाजप नेतेही यात सामील झाले आहेत अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे आणि त्यांना मोठा अडसर ठरतोय तो केंद्र सरकारचा.