अमृत महोत्सवाच्या शासकीय जाहिरातीमध्ये स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे फोटो, राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान छापण्याची मागणी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- भारतीय स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ साजरा करतांना, राज्यातील सत्ताधारी भाजप नागरी कररूपी पैशातुन करोडोंच्या जाहिराती करीत आहे.  त्या शासकीय जाहीरातींमध्ये, “स्वातंत्र्याच्या जन-नायकांचे, महात्मा गांधींसह प्रमुख स्वातंत्र्य सेनानींचे फोटो,  राष्ट्रीय तिरंगा ध्वजाची संहिता, तिन्ही रंगांचा मतिथार्त व संविधान (प्रीअँबल) छापून” त्यांचा कृतज्ञता’पर आणि गौरवपर विशेष उल्लेख करण्याची मागणी ‘राजीव गांधी स्मारक समिती व Knowing Gandhi, Pune (गांधी जाणूयात)’ तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

सत्ताधारी भाजपनेते ‘करोडोंच्या नागरी पैशातून’ “स्वतःचेच् फोटो” झळकावून घेण्याची हौस पुरी करत आहेत.  हा प्रकारच मुळी संकुचित व आत्मकेंद्रीत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित केंद्र सरकारने स्वातंत्र्य संग्रामाच्या केंद्रीय माहीती व नभोवाणी विभागा कडील पुर्वी दाखवल्या जात असलेल्या चित्रफीती दाखवून ऐतिहासिक स्मृतींना सुवर्ण झळाळी देण्याचे कार्य देखील सत्ताधार्यांनी करावे अशी मागणी देखील दोन्ही संस्थांच्या वतीने आयोजीत पत्रकार परीषदेत करण्यात आलीं.

या प्रसंगी राजीव गांधी स्मारक समिती संस्थापक अध्यक्ष व काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, जेष्ठ सदस्य पुणे शहर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष थोरवे, ‘गांधी जाणुयात’चे संस्थापक अध्यक्ष संकेत मुनोत, भाऊ शेडगे, संजय मानकर, संजय अभंग, महेश अंबिके, शंकर शिर्के, अशोक काळे, उदय लेले इ उपस्थित होते.

 ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवतांना तिरंगा ध्वजाचा मतीतार्थ  सत्ताधाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे असुन, तिरंगा हा खादी व स्वदेशी कापडाचा असावा, अशीच त्यामागील धारणा व सरकारी धोरण होते. मात्र मोदी सरकारने चिन या शत्रू राष्ट्राकडून करोडोंचा महसूल देऊंन,  पॅालीस्टर झेंडे घेण्याचा घातलेला घाट निंदनीय आहे.  ज़र अमृत महोत्सव निश्चित होता, तर स्वदेशी कापडातून देखील ‘देशांतर्गत तिरंगा ध्वजांचे ऊत्पादन केंद्रातील सरकारला शक्य झाले असते’ व शासकीय पैशांचा चुराडा होऊन , आज येणारे “निकृष्ट झेंडे खरेदी करण्याची वेळ व नामुष्की प्रशासनावर आली नसती” असे काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी नमूद केले.

राज्यातील भाजप नेते पंतप्रधान मोदी साहेबांना खुश करण्यासाठी बेताल विधाने करीत आहेत.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीने बोलावे अशी टिप्पणीही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी केले. देवेंद्र फडणवीसांच्या म्हणण्या प्रमाणे जर ‘भारताने चीनला प्रत्यक्ष घुसखोरी करू न देतां’ उलट अनेक पट त्यांचेच चीनी सैन्य मारले असल्यास ते कसे? व ? हे आपल्या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्र्यांना पटवून द्यावे, अशी मागणी देखील प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *