पुणे—जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती आज (शनिवार) पुन्हा खालावली आहे. विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटर वर असल्याचे त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली. मात्र, त्यांच्या निधनाच्या समाज माध्यमांवर वृत्तामुळे आणि त्यांच्या बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. मात्र, त्यांच्या निधनाच्या या अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे आणि पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो तसेच ते डोळे उघडत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली होती.
दरम्यान आज पुन्हा (शनिवार) विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली आहे. तसेच विक्रम गोखले यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी दिली आहे.
शिरीष याडगीकर म्हणाले, “ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. त्यांचा रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी औषधे चालू आहेत.