जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे-मुंबई मनोरंजन
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)- आपल्या दमदार अभिनयाने मराठी – हिंदी, नाटक, चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान दुख:द निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाट्य आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गोखले यांना मधुमेहाचा त्रास बळावल्याने पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गेल्या दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना जलोदराचा त्रासही होत होता. उपचारादरम्यान, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील

विक्रम गोखले यांनी अनेक मराठी आणि हिंदी सुपरहीट चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. ;हम दिल दे चुके सनम’, भूलभुलैया, मिशन मंगल, अग्निपथ, दिलसे यासारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये विक्रम गोखले यांनी काम केलं आहे. नटरंगमधील त्यांचा नाना पाटेकर यांच्यासोबतच संवाद अजरामर संवाद म्हणून ओळखला जातो.

गोखले यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून काम केले आहे. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले, तर, सन २०१३साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

 विक्रम गोखले यांची गाजलेली नाटके

‘एखादी तरी स्मितरेषा’, ‘कथा’, ‘कमला’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘के दिल अभी भरा नहि’, ‘खरं सांगायचं तर’, ‘छुपे रुस्तम’, ‘जावई माझा भला’, ‘दुसरा सामना’, ‘नकळत सारे घडले’, ‘पुत्र मानवाचा’, ‘बॅरिस्टर’, ‘मकरंद राजाध्यक्ष’, ‘महासागर’, ‘मी माPया मुलांचा’, ‘संकेत मीलनाचा’, ‘समोरच्या घरात’, ‘सरगम’, ‘स्वामी’ हि त्यांची गाजलेली नाटके होती. 

विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट

‘मॅरेथॉन जिंदगी’, ‘आघात’, ‘आधारस्तंभ’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘कळत नकळत’ ‘ज्योतिबाचा नवस’, ‘दरोडेखोर’, ‘दुसरी गोष्ट’, ‘दे दणादण’, ‘नटसम्राट’, ‘भिंगरी’, ‘महानंदा’, ‘माहेरची साडी’, ‘लपंडाव’, ‘वजीर’, ‘वऱहाडी आणि वाजंत्री’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘सिद्धान्त’ हे गोखले यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. 

 विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट

‘अकेला’, ‘अग्निपथ’, ‘अधर्म’, ‘आंदोलन’, ‘इvसाफ’, ‘ईश्वर’, ‘कैद में है बुलबुल’, ‘क्रोध’, ‘खुदा गवाह’, ‘घर आया मेरा परदेसी’, ‘चँपियन’, ‘जखमों का हिसाब’, ‘जजबात’, ‘जय बाबा अमरनाथ’, ‘तडीपार’, ‘तुम बिन’, ‘थोडासा रूमानी हो जाय’, ‘धरम संकट’, ‘परवाना’, ‘प्रेमबंधन’, ‘फलक द स्काय’, ‘बदमाश’, ‘बलवान’, ‘मुक्ता’, ‘यहि है जिंदगी’, ‘याद रखेगी दुनिया’, ‘लाईफ पार्टनर’, ‘लाडला’, ‘वजीर’, ‘श्याम घनश्याम’,  ‘सती नाग कन्या’, ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘स्वर्ग नरक’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हसते हसते’, ‘हे राम’ हे हिंदी चित्रपट गाजलेले आहेत.

दूरचित्रवाणी मालिका

 ‘अकबर बिरबल’, ‘अग्निहोत्र’, ‘अल्पविराम’, ‘उडान’, ‘कुछ खोया कुछ पाया’, ‘जीवनसाथी’, ‘द्विधाता’, ‘मेरा नाम करेगा रोशन’, या सुखांनो या’, ‘विरुद्ध’, ‘संजीवनी’, ‘सिंहासन’ या मालिकांमधून गोखले यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

गोखले यांना मिळालेले पुरस्कार

 ‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय  पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून)

 ‘विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कार’ (२०१५)

‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे बलराज साहनी पुरस्कार

 ‘हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार’ (२०१७)

 ‘पुलोत्सव सvमान’ (२०१८)

 ‘चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ या पुरस्कारांनी गोखले यांना चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे. 

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *