Pushpa naam hai mera, phul nahi fire hum

तोपर्यंत सरकार पडणार नाही-अजित पवार

राजकारण
Spread the love

पुणे- राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षामध्ये अधून मधून काही ना काही कारणावरून मतभेद,धुसभुस  आणि त्यावरून नाराजी बघायला मिळते.

कॉँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाने त्यांना पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. तर कॉँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावर दावा सांगितला. दुसरीकडे नाना  पटोले यांना कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद दिल्याने शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याचे चित्र आहे.

अजित पवार यांनी  मात्र, सरकारला कुठलाही धोका नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे बोलले जाते तशा तारखा सांगितल्या जातात मात्र त्यात काही तथ्य नाही. जोपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्हे पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत हे सरकार पडणार नाही असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *