समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व- सुरेश कोते


नारायणगाव : “देशासाठी, समाजासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेऊन मुलांना घडवतात. समाज घडविण्यात शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे अभिमानास्पद काम जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघ करीत आहे,” असे मत लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांनी व्यक्त केले.

जुन्नर तालुका कुंभार समाज शिक्षक संघातर्फे शिक्षक दिनानिमित्त नुकताच ‘गुणगौरव समारंभ २०२२’ आयोजिला होता. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सुरेश कोते बोलत होते. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील पर्यवेक्षीय अधिकारी रंगनाथ जाधव, ह.भ. प. निलेश महाराज कोरडे यांच्या हस्ते शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय अंबाडे, कुंभार समजोन्नती मंडळाचे अध्यक्ष संतोष कुंभार, पांडुरंग कार्लेकर गुरुजी, बाबाजी कुंभार आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  संरक्षण,सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार- भारतीय मजदूर संघ

सुरेश कोते म्हणाले, “विद्यार्थ्यांना घडविण्याची जुन्नर तालुक्याची परंपरा आहे. या तालुक्याला शिवाजी महाराजांच्या काळापासून एक वेगळा इतिहास आहे. शिक्षकांचा सत्कार करण्याचे संघाचे काम कौतुकास्पद आहे. शिक्षकांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य असेच अविरतपणे सुरू ठेवावे.” दरम्यान, सत्कारार्थी विद्यार्थी, शिक्षकांनी आपला सन्मान केल्याबद्दल संघाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love