पुणे—राज्यात आणि पुणे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० मार्च रोजी देहू येथे होणारा जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७३ वा सदैह वैकुंठगमन सोहळा (बीज उत्सव ) 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं होणार असल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानने पत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, देहू येथील तुकाराम बीज सोहळा कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरा करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे असे आव्हान देत वारकरी संघटनेचे अध्यक्ष बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना ‘चलो देहू’ची दिली हाक दिली आहे.
पुणे जिल्ह्यात दररोज कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लावले जात आहे. येत्या ३० मार्च रोजी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७३ वा वैकुंठगमन सोहळा (बीज उत्सव ) आहे. मात्र, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूमध्ये 29 आणि 30 मार्चला पोलीस विभागाने केली जमावबंदीचे आदेश काढले आहेत. मात्र 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं तुकाराम बीजेचा सोहळा करण्याची संस्थानची भूमिका आहे. कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग पाहता सोहळा साध्या पद्धतीनेच करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७३ वा सदैह वैकुंठगमन सोहळा (बीज उत्सव ) ३० मार्च रोजी संपन्न होणार आहे. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा शासनाच्या आदेशानुसार फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. हे सर्व वारकरी भक्तांनी तसेच सर्व दिंड्यावाल्यांनी याची नोंद घ्यावी.
त्यामुळे यावर्षीच्या बीज उत्सव सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने सर्वाना आवाहन करण्यात येते कि कुणीही बीज उत्सव सोहळ्यास श्री क्षेत्र देहूला येऊ नये. प्रत्येकाने आपल्या घरीच बीज उत्सव सोहळा गाथा पारायण करून साजरा करावा व संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, पालखी सोहळ्या संदर्भात ३१ मार्च रोजी होणारी दिंड्यावाल्यांची बैठकही स्थगित करण्यात आली आहे. पुढील बैठकीची तारीख नंतर कळवली जाईल , असे संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.