ट्रम्प यांच्या कृतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण: खरंच आजारी की राजकीय स्टंट?

आंतरराष्ट्रीय
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोना-संक्रमित अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खरेतर व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांना वॉल्टर रीड रुग्णालयात तीन दिवस घालवल्यानंतर सोमवारी डिस्चार्ज मिळेल अशी अपेक्षा असताना आदल्या दिवशी ते गाडीतून रुग्णालयातून बाहेर आले आणि समर्थकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांच्या या निर्णयामुळे वाद निर्माण झाला आहे. ते त्यांच्या ताफ्यासह बाहेर का आले? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून त्यांच्या या कृतीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत डॉक्टर आणि अधिकारी योग्य माहिती देत ​​आहेत की काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तसेच ट्रम्प यांचा हा राजकीय स्टंट तर नाही ना? असेही बोलले जात आहे.

रविवारीच डॉक्टरांनी हा खुलासा केला होता की अध्यक्ष ट्रम्प यांच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी इतकी खाली आली आहे की त्यांना स्टिरॉइड द्यावे लागले जे केवळ कोरोंनाची लागण झालेल्या रुग्णांची गंभीर स्थिति निर्माण झाल्यानंतर दिले जाते.. ट्रम्प यांची तब्येत वेगाने सुधारत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल आणि नंतरचे उपचार ते व्हाईट हाऊसमध्ये व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मिडो यांनी सोमवारी फॉक्स न्यूजला सांगितले की हा दिवस अत्यंत महत्वाचा होता कारण अध्यक्ष ट्रम्प यांना लवकरात लवकर कामावर परत यायचे आहे.

परंतु काही काळ, त्यांच्यावर रुग्णालयातून बाहेर पडल्याबद्दलही ट्रम्प यांच्यावर  टीका केली जात आहे. वॉल्टर रीड हॉस्पिटलचे डॉक्टर जेम्स पी. फिलिप्स यांनी हा वेडेपणा असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी आपल्या ताफ्याबरोबर बाहेर जाणे अनावश्यक होते आणि त्यांनी स्वत:ला 14 कवारंटाईन केले पाहिजे. अशा वर्तनामुळे पुन्हा आजारी पडण्याचा धोका असतो किंवा मृत्यूही होऊ असे फिलिप्स यांनी म्हटले आहे.  

त्याचवेळी व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जुड डिरे म्हणाले की वैद्यकीय पथकाने अध्यक्ष ट्रम्प यांना रुग्णालयातून बाहेर येण्याची परवानगी दिली होती. यामध्ये पूर्ण काळजी घेतली गेली होती. अध्यक्ष ट्रम्प, अधिकारी आणि गुप्त सेवा एजंटसाठी सुरक्षित उपकरणांचा वापर करण्यात आला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी प्रचारादरम्यान सांगितले की त्यांचीही रविवारी कोरोंना टेस्ट करण्यात आली. परंतु त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.  पाच दिवसांपूर्वी, बिडेन यांनी ट्रम्प यांच्याशी 90 मिनिटांची मुक्त चर्चा केली. ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन कोरोना विषाणूबद्दल सावधगिरी बाळगत आहेत. शुक्रवारीच त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या.  

ट्रम्प यांना त्यांच्या आरोग्याबाबत सतत प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.  रविवारी त्यांच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या  ऑक्सिजनची पातळी कधी खाली आली या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते. तसेच ट्रम्प यांच्या फुफ्फुसाला  काही बाधा पोहचली आहे का याबाबतही काही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. त्यामुळे व्हाइट हाऊसच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच वेळी, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अमेरिकन जनतेला ट्रम्प यांच्या प्रकृतीच्या सद्यस्थितीबद्दल योग्य माहिती देत ​​आहेत का नाही? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *