सुशांत सिंह प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही


पुणे- सुशांतसिंह प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत हिला अप्रत्यक्ष दिलेला पाठींबा आणि या प्रकरणाची सीबीआय कडून चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे भाजपने हस्तक्षेप केल्याची टीका सातत्याने केली जात आहे. तसेच यामुळे भाजपची आणि पंतप्रधान मोदींची देशात आणि जगात प्रतिमा मलीन झाली आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवल्यामुळे जगात पंतप्रधान मोदींचे कौतुक होत आहे असे ते म्हणाले.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात भाजपच्या हस्तक्षेपामुळे देशात आणि जगात भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे, याबाबत बोलताना दानवे म्हणाले, सुशांतसिंह प्रकरणामुले भाजपची प्रतिमा मलीन झालेली नाही. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवल्यामुळे जगात पंतप्रधान मोदींचे कौतुक होत आहे असे ते म्हणाले. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्ही सरकार पाडणार नाही. हे अमर, अकबर अँथनीचे सरकार आहे. ते एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

अधिक वाचा  सरकारच्या वैधते विषयीची शंका व संशय, यातून ‘वेदांत-फॅास्कॅान’ या प्रकल्पास मुकण्याची वेळ महाराष्ट्रावर आली - गोपाळदादा तिवारी

हाथरस येथील घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले, जी घटना घडली त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. परंतु, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. त्यांची चौकशी सुरु असल्याने सुरुवातील तिथे कोणाला जावू दिले नाही. ती चौकशी तत्काळ होणे आवश्यक होते. त्यानंतर सर्वजण गेले असे त्यांनी स्पष्ट केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love