ट्रकची आठ वाहनांना धडक: १ ठार ५ जखमी


पुणे(प्रतिनिधी)— मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढच्या आठ ते नऊ वाहनांना जोरदार धडक दिल्याने पुढील वाहने एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाच व्यक्ती जखमी झाल्या. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कात्रज –देहूरोड रोडवरील नऱ्हे आंबेगाव येथील पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला.

 याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी साडेदहाच्या दरम्यान कात्रज कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एका मालट्रक चालकाचे नियंत्रण सुटून त्याने पुढील आठ ते नऊ वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पुढील वाहने एकमेकांना धडकत गेली. या विचित्र अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाचव्यक्ती  जखमी आहेत. मालट्रकची धडक इतकी भीषण होती की समोरील एक पिकअप टेम्पो थेट बाजूच्या चारीत कोसळून पडला.

अधिक वाचा  10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा व करिअर मार्गदर्शन

या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली. वाहने रस्त्यावर असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद करण्यात आला  आहे, त्यामुळे संपूर्ण वाहतुकीचा ताण हा एका बाजूवर येऊन मुंगीच्या गतीने वाहने पुढे सरकत आहेत. क्रेनच्या सहाय्याने मालट्रक आणि अपघातग्रस्त वाहने उचलण्यास सुरुवात झाली असून याबाबत अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love