अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते?

राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)—राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि गुप्तेश्वर पांडे यांच्यावर केलेल्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते असा सवाल करीत महाराष्ट्रात रोज हाथरस घडताहेत,  त्यावर यांना बोलायला वेळ नाही अशी टीका केली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे त्यांनी अगोदर लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला.

पुण्यामध्ये पत्रकारांशी दरेकर बोलत होते.

सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. “एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना दरेकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

मंत्री अब्दुल सत्तारांनी मराठा अरक्षणाविषयी प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला घरात घसून मारेल असा दम दिला. या प्रकरणाची चौकशी करून अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केली.  महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे अगोदर त्याकडे लक्ष द्या असा टोला त्यांनी लगावला.

 ट्रोलिंगची चौकशीच करायची असेल तर सर्वांचीच चौकशी करावी. त्यात राजकारण करू नये असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनाही दररोज ट्रोल केले जाते. सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येने फेक अकाउंट आहेत. मात्र काही विशिष्ट अकाउंटवर सायबर विभागामार्फत कारवाई करण्यात आली असून, सायबर विभागामार्फत सर्वच फेक अकाउंटवर कारवाई झाली पाहिजे असे ते म्हणाले. .

अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत अनेक तक्रारी आहेत. मुंबई वैद्यापीठात गोंधळ सुरू आहे. त्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. विद्यार्थ्यांच नुकसान होऊ देऊ नये असे ते म्हणाले.

 गुप्तेश्वर पांडेंबाबत बोलताना ते म्हणाले, गुप्तेश्वर पांडेंनी भाजप मध्ये प्रवेश केलाय का ? अजून बाळंतीनीला बाळ झालं नाही, पण बाळ व्हायच्या आधीच नाव ठेवायची घाई कशाला?

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *