जनहीताची कामे न केल्याने, सत्ताधाऱी भाजपवर हिंदुत्वाचा आधार घेण्याची वेळ- गोपाळदादा तिवारी


पुणे-  जनतेस दिलेले ‘एक ही आश्वासन पूर्ण करू न शकल्यानेच’ हिंदुत्वाचा आधार घेण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आली आहे. मात्र, आबाल, दुर्बल, अल्पसंख्याक, महीला व जनतेप्रती ‘न्याय व रक्षणाचा’ अपेक्षीत राजधर्म पाळण्यात ही सत्ताधारी पुरण अपयशी ठरत असून, महीला राष्ट्रीय खेळाडूंवर आंदोलनाची वेळ येणे व मणीपुर, महाराष्ट्रा सह अनेक राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा ऊडणे हे त्याचेच द्योतक असल्याची टिका काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी “सामाजिक सलोखा व सदभावना मेळावा – बैठकीत केली.

अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस सदस्य, नगरसेवक दत्ता बापु बहीरट होते. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारी कारस्थाने यशस्वी होणार नाहीत असे ही श्री दत्ता बहीरट यांनी सांगीतले. राजीव गांधी समिती माध्यमातुन गोपाळदादा तिवारी यांचे पुढाकाराने राबवत असलेल्या ‘सामाजिक सलोखा पंधरवड्यातुन’ स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, विविध धर्मिय राष्ट्रनेत्यांचे योगदान नव्या पिढीस व कार्यकर्त्यांना समजत आहे त्यामुळे सलोखा बैठका ही ‘ज्ञान शिबीरे’ ठरत असल्याचे ही दत्ता  बापु बहीरट यांनी सांगितले..!

अधिक वाचा  वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे- अमृता फडणवीस

राजीव गांधी स्मारक समितीच्यावतीने ५ जून ते १९ जून या कालावधीमध्ये पुणे शहरात “सामाजिक सलोखा आणि सद्भावना पंधरवडा” साजरा केला जात आहे. यानिमित्त शहरातील विविध भागांत, वस्त्या व सोसायटी येथे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळदादा तिवारी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पांडव नगर, शिवाजी नगर येथे शुक्रवार दि १६ रोजी, सामाजिक सलोखा – कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सध्या राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. भाजपा आ. नितेश राणे पुण्यात येऊन लव्ह जिहादच्या नावावर मोर्चे काढून परिस्थिती बिघडवण्याचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात भीती, संशय व दुही चे वातावरण होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे स्मारक समिती सदस्य जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी सुभाष थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले. ॲड फैयाज शेख यांनी सुत्र संचालन केले.

अधिक वाचा  संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट, जनताच यशस्वी होऊ देणार नाही-केशव उपाध्ये

या प्रसंगी, म.प्र.यु.कॉंचे सचिव वाहिद निलगर कार्यक्रमाचे संयोजक व अल्पसंख्याक नेते जावेद निलगर, स्मारक समिती जेष्ठ सदस्य व कॉंग्रेसजन सुभाष थोरवे, रामचंद्र शेडगे, धनंजय भिलारे,आरिफ निलगर, गणेश गुगळे, राहुल वंजारी, भारत पवार, विक्रांत धोत्रे, साजिद शेख, सुरेश नांगरे, नारायण पाटोळे, धुमाळ साहेब, बाबा सय्यद, इ कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व परीसरातील स्थानिक नागरीक उपस्थित होते.. श्री गणेश गुगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love