कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?- कोणाला म्हणाले अजित पवार?


पुणे- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्यावरील बलात्कराची तक्रार रेणू शर्मा हिनं मागे घेतली आहे. त्यामुळं हे प्रकरण शांत होईल असं वाटत असलं तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. विरोधकांच्या या आरोपांबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, असा इशारा दिला आहे .

गायिका रेणू शर्मा हिनं धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तसंच, काही आरोपही केले होते. यापैकी रेणू शर्मा हिच्या बहिणीशी संबंध असल्याची व तिच्यापासून दोन मुलं असल्याची कबुली मुंडे यांनी दिली होती. त्यावरून जोरदार वादळ उठले होते. बलात्काराच्या तक्रारीमुळं मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. मात्र, तक्रारच मागे घेतली गेल्यामुळं त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुलं असल्याची बाब मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवली असल्यानं त्यांच्यावरील टांगती तलवार कायम आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा  कोव्हॅक्सिनसाठी खा.बापट यांचे केन्द्राला साकडे

पुण्यात झालेल्या एका बैठकीनंतर ते बोलत होते. ‘धनंजय मुंडे यांनी माहिती लपविली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर पत्रकारांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया विचारली असता,  धनंजय मुंडे साहेबांना जे काही सांगायचे होते ते त्यांनी सांगितलं आहे. मग जर रेकॉर्ड पहायचं झालं तर अनेकांनी काय काय थोडी लपवाछपवी केली आहे ते सांगू का? ते आपल्यालाही माहिती आहे ना.  विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती, लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का? असे प्रश्न उपस्थित करीत इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, असा इशारा त्यांनी दिला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love