A 16-year-old school boy was brutally beaten and his naked video went viral on social media.

मांढरदेवीला नेऊन पतीने खोल दरीत पत्नीला ढकलून देत केला तिचा खून

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

Murder : देवदर्शनाच्या बहाण्याने सातारा(Satara) जिल्हय़ातील मांढरदेवीला(Mandhar devi) नेऊन पतीने(Husband) खोल दरीत ( deep valley) पत्नीला(Wife) ढकलून देत तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरीत ढकलल्याने झाडीत अडकलेल्या पत्नीचा पतीने दरीत उतरून साडीने गळा आवळून खून ( Murder by strangulation) करून मृतदेह(Dead Body) दरीत ढकलून दिल्याचे समोर आले असून, याप्रकरणी आरोपीला लोणीकंद(Lonikand) पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी पती अमोलसिंग मुरली जाधव (वय -२६ )( Amol Singh Murali Jadhav) याला अटक करण्यात आली आहे. ललिता अमोलसिंग जाधव (Lalita Amol Singh Jadhav) (वय-३६ , रा. भैरवनाथ मंदिराजवळ, फुलगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस हवालदार प्रताप आव्हाळे यांनी याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. अमोलसिंग याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार मागील वषी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांकडे दिली होती. पोलिसांकडून याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत होता. (The husband killed his wife by pushing her into a deep valley)

अमोलसिंगने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बेपत्ता झालेल्या ललिता जाधवचा शोध घेत होते. त्यानंतर पोलिसांना तपासात खुनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळाली. चौकशीसाठी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्मया दाखविताच त्याने पत्नीच्या खुनाची कबुली पोलिसांना दिली. अमोलसिंग याने कुटुंबीयांच्या दबावामुळे वयाने मोठी असलेल्या ललिताशी विवाह केला होता. दोघांमध्ये दहा वर्षांचे अंतर होते. त्याचे पत्नीशी नेहमी वाद होत होते. वयाने मोठी असल्याने पत्नीला त्याने सोडचिठ्ठी देण्यास सांगितले होते. मात्र, ललिताने सोडचिठ्ठी देण्यास  नकार दिल्याने तो तिच्यावर रागावलेला होता. त्यामुळे त्यांच्यात कायम वाद व्हायचे. 

 २८ ऑक्टोबर २०२३  रोजी आरोपीने भाड्याने कार घेऊन दोघे जण सातारा जिल्हय़ातील मांढरदेवी येथे दर्शनासाठी निघाल्याचे सांगून घराबाहेर पडले. मांढरदेवी परिसरात पोहोचल्यानंतर त्याने कारचालकाला कार वाहनतळावर लावण्यास सांगितले. त्यानंतर दोघे जण मांढरदेवी घाटातून चालत निघाले. घाटात ललिताशी गप्पा मारण्याचा त्याने बहाणा केला. दरीजवळ थांबलेल्या ललिताला त्याने अचानक धक्का दिल्याने ती दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर ती झाडाच्या फांदीत अडकली होती. त्यामुळे अमोलसिंग दरीत उतरला. साडीने गळा आवळून त्याने तिचा खून केला. ती मयत झाल्याची खात्री केल्यानंतर मृतदेह दरीत ढकलून तो पसार झाल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *