ऊत्तराखंड टनेल दुर्घटनेची’ न्यायालयीन चौकशी व्हावी- गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

मुंबई- उत्तराखंड टनेल मधील खोदकाम करणाऱ्या ४१ कामगारांची ‘जीवन मरणाच्या संघर्षातुन’ सुटका झाल्याचे सर्व देशाने पाहीले. त्याबद्दल १७ दिवस राबणाऱ्या सर्व शासकीय व निम शासकीय यंत्रणा व मजुरांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांचे अभिनंदन व आभार..! मात्र ‘मजुरांवर ही जीवधेणी परिस्थिती कां ओढावली(?) याची चौकशी ही झाली पाहीजे.

सदर टनेल’चे खोदकाम करणाऱ्या ‘नवयुग इंजिनिअरींग कंपनीवर’ सरकार काय कारवाई करणार (?) असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

सदर टनेल’चे खोदकाम ‘नवयुग कंपनीस’ देतांना, त्यांची तांत्रिक क्षमता व अनुभव पाहीले गेले काय..(?) सदर ‘नवयुग कंपनी’ या मजुरांच्या जीवाशी खेळत होती काय(?) मजुरांच्या जीवाच्या सुरक्षेच्या कोणत्याही ऊपाय योजनांची आखणी करणे सदर कंपनीस गरजेचे का वाटले नाही..(?) नैसर्गिक व पर्यावरणाचे नियम व संकेत तुडवले गेले काय (?) असे अनेक प्रश्न समोर येत असुन, मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व अक्षम्य बेपर्वाई करणाऱ्या (व अड़ानी ग्रुप’च्या अघिपत्याखाली असल्याचा आरोप होणाऱ्या) ‘नवयुग इंजिनीअरिंग कंपनी’वर सरकार काय कारवाई करणार(?) असा सवाल उपस्थित करून या दुर्घटनेची जबाबदारी सरकार कोणावर निश्चित करणार (?) हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने केली.

अधिक वाचा  तर मी लगेच खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार : संभाजीराजे छत्रपती

सदर टनेल’च्या कामात, ‘मजुरांच्या सुरक्षेची तांत्रीक पुर्व तयारी’ सदर कंपनीने काय व कशा प्रकारे केली होती..(?) त्या ठीकाणी अत्यावश्यक असणारे ह्युम पाईप का लावले गेले नाहीत..? सदरचे खोदकाम करण्याच्या कामातील तांत्रिक सुरक्षेच्या बाबींकडे का दुर्लक्ष करण्यात आले (?) या बाबी स्पष्ट होऊन दोषींवर तातडीने सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा कोणाच्या तरी अक्षम्य बेपर्वाई मुळे असे प्रकार पुढील काळात ही घडू शकतात. त्यामुळेच “ऊत्तराखंड टनेल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी” अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गेपाळदादा तिवारी यांनी केली.

मध्यंतरी गुजरात मधील मोरवी पुलाची दुर्घटना ही दुर्लक्षीत होऊन दोषींवर कारवाई झाल्याचे पहावयास मिळाले नाही, ही दुर्दैवी बाब असुन, संकट पश्चात काळजी घेण्या ऐवजी, संकट पुर्व खबरदारी व नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या ‘जबाबदार सरकारांची’च देशाला खरी तर गरज आहे.

अधिक वाचा  दार उघड उद्धवा दार उघड- भाजपचे घंटानाद आंदोलन

गेल्या ७० वर्षात सरकारच्या बेर्पाईमुळेच, देशांतर्गत पुलवामा, मोरवी, रेल्वे अपघात, ऊत्तराखंड टनेल इ दुर्घटना घडल्याचे पहायला मिळाल्या नाहीत अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love