शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कारआरोप प्रकरण:मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले: पिडीत तरुणीचा दावा

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे. मला बळजबरीने पोलिसांना जबाब देण्यास चित्रा वाघ यांनी भाग पाडले असल्याचा दावा या तरुणीने केला आहे. दरम्यान, पीडितेने आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना स्वत: फोन करून भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. शिवाय, आपणास काही माहिती द्यायची असल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे आता या प्रकरणास वेगळे वळण लागणार असल्याचे दिसत आहे.

माझ्यात आणि कुचिक यांच्यात जे झालं झालं आहे ते खरं आहे पण मला तक्रार द्यायची नव्हती. जेव्हा माझ्या एका काकांच्या सहाय्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी संबंध आला. तेव्हा चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली असल्याचा धक्कादायक खुलासाही पीडित तरुणीने केला आहे.

दरम्यान, या सदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणर यांनी एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे. “शेवटी दूध का दूध पाणी का पाणी झालंच. रघुनाथ कुचिक प्रकरणात संबंधित पीडितीने काही दिवसापूर्वी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत माझी संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जावी, असं तिने म्हटलं होतं. त्यानुसार पोलिसांना निर्देश देऊन आपण तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी देखील केली. ज्यावेळेस संबंधित पीडितीने मदत मागितली त्यावेळी संपूर्ण मदत आणि सहकार्य पीडितेस केलेलं आहे. परंतु, यामध्ये काही व्यक्ती दिवसरात्र महिला सुरक्षेच्या दृष्टीने दिवसरात्र टाहो फोडतात, परंतु स्वत: च्या राजकीय हव्यासा पोटी एका युवतीचं आयुष्य त्यांनी उध्वस्त केलेलं आहे. त्यामुळे मंदीत संधी साधणारे हे लोक आहेत. आज पीडितीनेच खळबळजनक वक्तव्य करून यांचा खुलासा केलेला आहे. ” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. तसेच, “राज्य महिला आयोगाच्यावतीने संबंधित पीडितेस निश्चितपणे न्याय दिला जात असताना, काही वेळापूर्वीच तिचा मला फोन आला आणि तिने प्रत्यक्ष भेटून काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. निश्चितच मी देखील तिची भेट घेणारच आहे. परंतु, यामध्ये काही धागेदोरे आहेत, नक्की काय प्रकरण आहे याची संपूर्ण माहिती घेऊन संबधित व्यक्ती कोणी या पद्धतीने जर एखाद्या व्यक्तील बदनाम करत असेल, एखाद्या युवतीचा आयुष्य उध्वस्त करत असेल तर त्यावर निश्चतपणे कडक कारवाई करण्याच्या सूचना या राज्य महिला आयोगाकडून दिल्या जातील. ” असंही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणर यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा – रूपाली पाटील

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप, डांबून ठेवणे, फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी, अॅपचा वापर करून एसएमएस पाठवणे, खोटे एसएमएस तयार करणे, खोटी तक्रार देण्यास भाग पाडणे यावरून चित्रा वाघ यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा. अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

पोलिस पिडीतेचा जबाब पुन्हा नोंदवणार

पुणे पोलिसांनी देखील याप्रकरणाची दखल घेतली आहे. कुचिक प्रकरणातील पिडीतेचा जबाब पुन्हा नोंदवणार तसंच नव्या दाव्यांच्या अनुषंगाने तपास करणार असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटले आहे. कुचिक यांच्या विरोधात विशिष्ट पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी चित्रा वाघ यांनी आपणाला भाग पाडलं असल्याचा आरोप या पीडितेनं केल्यानंतर या प्रकरणाला वेगळ वळणं लागलं आहे.

रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पिडीत तरुणीने कुचिक यांनी लग्नाच्या भूलथापा देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तक्रारीत केला होता. तसंच गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा आरोपही केला होता. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागल्याने आपण या प्रकरणाची नव्याने चौकशी करणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *