रोटरी क्लब स्कॉन प्रो आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील पहिल्या कॉर्पोरट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- रोटरी क्लब चिंचवड-पुणे पुरस्कृत रोटरी क्लब स्कॉन प्रो या भारतातील दुसऱ्या आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील पहिल्या कॉर्पोरट रोटरी क्लब चा पदग्रहण समारंभ नुकताच पी वाय सी क्लब, डेक्कन जिमखाना, पुणे येथे संपन्न झाला. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रोटेरिअन पंकज शहा यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरिअन रामचंद्र मायदेव यांना नव्या क्लब ची सनद (चार्टर) देण्यात आली.

या प्रसंगी स्कॉन प्रोजेक्ट्स चे अध्यक्ष निलेश चव्हाण, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे मेम्बरशिप डायरेक्टर रोटेरिअन शीतल शहा, मेम्बरशिप समिती प्रमुख रोटेरिअन ब्रिज सेठी, रोटरी क्लब चिंचवडच्या अध्यक्ष रोटेरिअन डॉक्टर शिल्पागौरी गणपुले, सेक्रेटरी रोटेरिअन प्रसाद गणपुले, नवनिर्वाचित चिटणीस रोटेरिअन राहुल पूरकर, नियोजित अध्यक्ष रोटेरिअन अंजली काळे आणि फर्स्ट लेडी अंजली मायदेव आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास पूर्व प्रांतपाल रोटेरियन रवी धोत्रे, रोटेरियन प्रमोद जेजुरीकर, रोटेरियन मोहन पालेशा, रोटेरियन दीपक शिकारपूर, रोटेरियन अभय गाडगीळ तसेच फाउंडेशन डायरेक्टर, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ रोटेरियन पंकज पटेल, सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन डॉ. शुभांगी कोठारी, रोटरी क्लब चिंचवड पुणे चे सदस्य रोटेरिअन किशोर गुजर, रोटेरिअन सुरेंद्र शर्मा, रोटेरिअन हर्षा जोशी, रोटेरिअन प्रमोद जाधव आणि रोटेरिअन अजित कोठारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन राहुल अवचट यांनी आणि आभार प्रदर्शन सेक्रेटरी रोटेरियन राहुल पुरकर यांनी केले.

रोटेरियन  प्रांतपाल पंकज शहा म्हणाले की कॉर्पोरेट क्लब हि आंतरराष्ट्रीय रोटरी जगतातील नवीन संकल्पना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ने उचलून धरली. सर्वसामान्यपणे वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रातील लोक एकत्र येऊन रोटरी क्लब ची स्थापना होते. परंतु कॉर्पोरेट क्लब अंतर्गत एकाच कंपनीतील लोक एकत्र येऊन रोटरी क्लब स्थापन करून रोटरीचे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतात. रोटरीच्या माध्यमातून सदस्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होऊन समाजाला कर्तृत्ववान नेतृत्व लाभून सामाजिक विकासाला सकारात्मक वळण निश्चितच लागू शकते. 

स्कॉन प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष निलेश चव्हाण म्हणाले की २००८ मध्ये स्थापन झालेल्या स्कॉन प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भारत तसेच इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी इत्यादी देशातील कंपन्यांचे बांधकाम प्रकल्प स्कॉन तर्फे यशस्वीपणे राबविले जात आहेत. देशभर कंपनीचे प्रकल्प यशस्वी रीतीने चालू आहेत. स्कॉन प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रमात स्वतःचा सहभाग नोंदविला आहे. छोट्या खेड्यांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्यापासून ते सांगली कोल्हापूर आणि चिपळूण पूर परिस्थिती मध्ये स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत पोहोचण्या पर्यंत अनेक उपक्रम कंपनीतर्फे राबवण्यात आलेले आहेत. रोटरी क्लब च्या माध्यमातून समाजोपयोगी कार्यक्रम करण्यास स्कॉन प्रो कंपनीला निश्चितच एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 

रोटेरियन अध्यक्ष रामचंद्र मायदेव म्हणाले की नूतन प्रकल्प अत्यंत सफाईदारपणे आणि दर्जेदार पणे नियोजित वेळेत पूर्ण करणे हा स्कॉन प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नित्त्याची गोष्ट आहे. त्यामुळे रोटरीच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून खूप मोठे भरीव सामाजिक कार्य रोटरी क्लब स्कॉन प्रो तर्फे निश्चित करण्यात येईल यांनी दिली. याप्रसंगी स्कॉन प्रोजेक्टस प्रायव्हेट लिमिटेड च्या ३८ कर्मचाऱ्यांनी रोटरी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *