जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे- राज ठाकरे


पुणे— केंद्रात काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. आत्ता केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता असतानाही या यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जो माणूस नको आहे त्याला संपवण्यासाठी ईडी सारख्या यंत्रणांचा हातातल्या बाहुलीसारखा उपयोग केला जात आहे. ही अत्यंत चुकीची गोष्टी असून ज्यांनी खरंच गुन्हे केलेले आहेत, ते मोकाट सुटलेले आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

“माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन” असे वक्तव्य भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी कोंग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी केले होते. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे कधी सीडी बाहेर काढतात याची मी वाट पहातोय असे राज ठाकरे म्हणाले. 

अधिक वाचा  ...अन्यथा ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी- प्रकाश आंबेडकर

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बांधण्यात आलेल्या नवीन मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

सध्या राज्यात सरकार आणि भाजपामध्ये जे संघर्ष सुरू आहे किंवा महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सुरू असलेली धूसमूस पाहता कोण कोणाचा शत्रू आहे आणि कोण कोणाचा मित्र आहे, हे कळतच नसल्याचे ठाकरे म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love