मुंढवा केशवनगर भागाला कोणी वाली आहे का ? -नंदाताई जाधव


पुणे- पुणे महानगर पालिकेत मुंढवा केशवनगर हा  भाग समाविष्ट होऊन तीन वर्षे उलटली आहेत. परंतु,   येथील मांजरी रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून पुणे महानगरपालिका केवळ जनतेकडून कर रूपाने गोळा करीत असल्याचा आरोप करत मुंढवा केशवनगर भागाला कोणी वाली आहे का ? असा सवाल दामीनी बहुउद्देशीय महीला संस्थेच्या संस्थापिका  अध्यक्षा सौ. नंदाताई जाधव यांनी केला आहे.

केशवनगर या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. असे असताना या भागात रस्त्याचा पत्ता नाही, फूटपाथ नाही, पाणी नाही, कचरा निर्मूलनाची व्यवस्था नाही व फायर ब्रिगेडचे स्टेशन नाही. आज तीन वर्षे झाली पुणे मनपा ने मुंढवा केशवनगर हस्तांतर होऊन पण कामाची प्रगती काहीच झालेली नाही.  वारंवार पिण्याचा  पाण्याचा प्रश्न, ड्रेनजचा प्रश्न उपस्थित होतात.  भर चौकात रस्ता रूंदीकरण नाही या सर्व समस्यांनी केशवनगरची जनता ट्रस्ट झाली आहे. गायरान वस्ती आहे तीथे नको त्याने जागा अडवलेली आहे. अशा ठिकाणी छोटासा बगीचा करणे आवश्यक आहे. केवळ कर भरायचा परंतु सुविधा मात्र, काहीच नाही अशी परिस्थिति या भागाची असून केशवनगची प्रगती कधी होणार आणि या कठीण  परिस्थितीतून केशवनगच्या जनतेची सुटका कधी होणार असा प्रश्न  नंदाताई जाधव यांनी उपस्थित केला आहे.                  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #PIFF : महाराष्ट्र सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार- अविनाश ढाकणे