पक्ष कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही- जयंत पाटील यांचा रोख कुणाकडे? : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार?

राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे

पुणे – “काही चुका असतील तर कानात येऊन सांगा. शरद पवारांकडे तक्रार करा पण जाहीरपणे व समाजमाध्यमांवर बोलणे टाळा. पक्ष कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. शरद पवार देतील ती शिक्षा मी भोगेल”, या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी सोमवारी (दि. 10 जून) अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्स कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्याचा नक्की रोख कोणाकडे होता याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

अहमदनगरमध्ये काल (१० जून) राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सव शरद पवार गटाकडून साजरा करण्यात आला. यावेळी आगामी विधानसभेबाबत रणशिंग फुंकण्यात आले. दरम्यान यावेळी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याबाबतच्या वक्तव्याने मात्र चर्चांना उधाण आले आहे.

अधिक वाचा  आपआपसातील दुही संपवण्यासाठी राम मंदिर निर्मिती महत्वाची -आचार्य गोविंद देवगिरी महाराज

जयंत पाटील म्हणाले, “माझ्या अध्यक्षपदाबाबत काही लोकं महिने मोजत आहेत. परंतु मला केवळ चारच महिने द्या, मी सरकार आणून दाखवतो. त्यानंतर मी स्वतःच नमस्कार करीन. मात्र, विजयासाठी सर्वांना सोबत काम करावे लागेल. हा विजय सर्वांचा आहे. कोणी एकाने श्रेय घेऊ नये. माझ्याबाबत काही तक्रार असेल, तर थेट साहेबांकडे करा, उगाच ट्विट करून ती जाहीरपणे मांडू नका”,काही चुका असतील तर कानात येऊन सांगा. शरद पवारांकडे तक्रार करा पण जाहीरपणे व समाजमाध्यमांवर बोलणे टाळा. पक्ष कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. शरद पवार देतील ती शिक्षा मी भोगेल असे वक्तव्य त्यांनी केले होते.

रोख कुणाकडे?

आता या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांचा रोख कुणाकडे होता याबाबत चर्चाना उधाण आले आहे. जयंत पाटील यांचा रोख रोहित पवार यांच्याकडे होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर रावेर येथील निकालाबाबत पक्षसंघटनेवर टीका केली होती. त्यामुळे हाच मुद्दा पकडून त्यांनी वरील भाष्य केलं असावं अशी चर्चा आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love