रमेश चेन्नीथला

महात्मा गांधींच्या ‘लोककल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेचे देशास विस्मरण- रमेश चेन्नीथला

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ‘मेरा जीवन, मेरा संदेश’… या ध्येय वाक्यात बापूंची अपेक्षीत आदर्श जीवनाची संकल्पना होती. ज्यामागे सत्य, अहिंसा, मानवता, न्याय व समानतेची पंचतत्वे व भारतीय स्वातंत्र्या मागील ‘लोकशाहीची मूल्ये’ दडलेली होती. ज्यायोगे ‘लोककल्याणकारी राज्या’ची महात्मा गांधींची संकल्पना होती त्याचेच आज सत्ताधीशांना विस्मरण झाल्याचे देशातील परिस्थिती सांगते आहे, मात्र तरी देखील राम राज्याची भलावण केली जाते असे प्रतीपादन काँग्रेस जेष्ठनेते, केरळ चे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे प्रभारी श्री रमेश चेन्नीथला यांनी केले.(The nation has forgotten Mahatma Gandhi’s concept of ‘Welfare State’)

“मला समजलेले ‘बापू’… विषयावरील निबंध स्पर्धच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष श्री नाना पटोले होते.

“राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ” यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित, इ. ८ वी ते १० वी (माध्यमिक शाळांमधील) विद्यार्थ्यांकरीता,  “मला समजलेले बापू अर्थात महात्मा गांघी” विषया वरील निबंध स्पर्धां आयोजीत केली होती, त्याचे पारीतोषिक वितरण समारंभ मा श्री रमेश चेन्नीथला यांचे शुभ हस्ते संपन्न झाले. राजीव गांधी स्मारक समिती अघ्यक्ष गोपाळदादा तिवारी व पुणे मुख्याध्यापक संघाचे अघ्यक्ष सुजीत जगताप व समिती सदस्य यांनी मान्यवरांचे स्मृती चिन्ह, शाल व पुस्कांचा संच देऊन स्वागत सत्कार केला.

यावेळी विध्यार्थ्यांना व पालकांना संबोधन करताना श्री नाना पटोले यांनी सांगितले की, गांधी ही मजबुरी नसून मजबुती आहे. गांधी विचार विध्यार्थ्यांमध्ये किती प्रभावी पणे रुजला आहे याची विजेत्या विध्यार्थ्यांचे निबंध वाचून प्रचिती आली. तसेच या स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल आयोजक राजीव गांधी स्मारक समिती आणि शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महात्मा गांधींवर निबंध लिहीणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व निवडक निबंधातील बापूं वरील काव्य वाचन केले. बापूं’ना ‘राष्ट्रपिता’ पदवी ही सुभाष बाबूंनीच् दिल्याचे ९ वी च्या विद्यार्थ्याने निबंधात सांगणे हे सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी मध्ये मतभेद दर्शवणाऱ्या प्रवृत्तींना चपराक असल्याचे त्यांनी सांगीतले.

महात्मा गांधी वरील निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची व राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाल्याचे जाणवले तसेच शाळांच्या प्रशासना कडुन ही ‘स्मारक समिती सदस्यांना’ सन्मान व सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे स्पर्धेचे संयोजक व निमंत्रक गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. आपल्या स्वागत प्रस्ताविकात, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, स्वातंत्र्या करीता शहीद झालेल्यांचे योगदान व ‘स्वतंत्र – भारताची’ ऊभारणी इ बाबत विद्यार्थ्यांना “निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन अंतर्मुख करण्याचा प्रयत्न असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले. महात्मा गांधींनी अधोरेखीत केलेली ११ व्रते व ७ समाजिक पापें हाच ‘आदर्श जीवनाचा’ नैतिक पाया असल्याचे सांगुन ‘सिध्दांत बिना राजनिती’ आणी ‘कर्म बिना घन’ (कष्टा विना पैसा) ही सामाजिक पापें आजच्या लोकशाही व्यवस्थेत अडगळीत पडल्याचे पहायला मिळते  असे ही गोपाळदादा तिवारी यांनी या प्रसंगी सांगितले.

शिक्षक संधाचे श्री विजय कचरे व सचिन दुर्गाडे यांनी सुत्र संचालन केले, नुमवि च्या श्री नलावडे सर यांनी आभार मानले.

स्पर्धेस सक्रीय सहकार्य करणाऱ्या, आर्थिक योगदान देणाऱ्या व रोख पारितोषिके पुरस्कृत करणाऱ्या,

अभिनव शिक्षण संस्थेचे श्री राजीव जगताप (इ १० वी), श्री सुभाषशेठ थोरवे (इ ९वी), श्री भोलाशेठ वांजळे (इ ८वी) यांचेसह, धनंजय भिलारे, स्वप्नील जगताप तसेच प्रमुख परीक्षक मंडळाचे प्रमुख व बाल साहीत्यीक प्रा. डॅा दिलीप गरूड (कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक), तसेच गांधी विचारांचे अभ्यासक रमाकांत पाठक, सौ नानगुडे (मॅाडर्न हायस्कुल), सौ माधवी कुलकर्णी(आपटे प्रशाला), श्री नलावडे सर व श्री तारू सर (नुमवि), प्रा सुरज कुलकर्णी(आनंद आश्रम शाळा) सौ वाजेदा मुलाणी (रावसाहेब पटवर्धन प्रशाला), सौ कल्पना शेरे, प्रा संदिपान पवार(आण्णा साहेब मगर विद्यालय) इ परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री दिगंबर देशमुख, महाराष्ट्राचे सह प्रभारी श्री. आशीष दुआ, गटनेते श्री बाळासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष श्री. नानाभाऊ गावंडे, श्री. संजय राठोड, प्रदेश सचिव श्री. रामविजय बुरुंगळे, पुणे शहर अघ्यक्ष अरविंद शिंदे, सौ शारदा गोपाळ तिवारी, रामचंद्र (भाऊ) शेडगे, आबा तरवडे, नंदू शेठ पापळ, विकास दवे, ॲड संदिप ताम्हणकर, ॲड फैयाझ शेख, हरीदास अडसूळ, गणेश शिंदे, गोरख पळसकर, संजय अभंग, गणेश मोरे, आशिष गुंजाळ, नरेश मते, महेश अंबिके, राजेश सुतार, प्रविण पेटकर इ उपस्थित होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

*निबंध स्पर्धेचा निकाल* –

प्रथम – ₹५,०००/- + स्मृती चिन्ह + पुस्तक + प्रशस्तीपत्र

द्वीतीय- ₹३,०००/-+ स्मृती चिन्ह + पुस्तक + प्रशस्ती पत्र

तृतीय(अ) ₹२,०००/-+ स्मृती चिन्ह + पुस्तक + प्रशस्ती..

तृतीय(ब) ₹२,०००/-+ स्मृती चिन्ह + पुस्तक + प्रशस्ती..

*इयत्ता १० वी*

प्रथम क्रमांकः- श्रेया रितेश भिसे- (आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल)

द्वितीय क्रमांकः- ऋतुजा संजय धुमाळ

( हुजूरपागा हायस्कूल लक्ष्मीरोड)

तृतीय(अ)क्रमांकः- जान्हवी सुनील सुरगुडे

( विश्वकर्मा हायस्कूल)

तृतीय(ब) क्रमांकः- सुफियान शेख

(नु.म.वी. मुलांची)

            *उत्तेजनार्थ*

(११ – प्रती ₹१,००० रोख + स्मृती चिन्ह + प्रशस्ति पत्र) 

१) नारायणी हंबीर-जिजामाता हायस्कूल

२) वैष्णवी विनायक पोतदार……॥……

३) भुमिका राजेंद्र माळवदकर……॥……

४) नाजुका अरूण हणवते ………॥……

५) अनुष्का दगडू आखाडे- सेवासदन

६) जान्हवी उमेश शिर्के ……॥……

७) निशा काकासो वाघमोडे- विश्वकर्मा       हायस्कूल

८) पार्वती पदमसिंग विश्वकर्मा- ल.रा.शिंदे हायस्कूल

९) तेजल संजय हरिहर- भारत इंग्लिश स्कूल

१०) तन्वी अमोल सप्तर्षी- हुजूरपागा हायस्कूल लक्ष्मीरोड

११) ऋषिकेश राजकुमार शिरसे- पेरूगेट भावे हायस्कूल

————————————————————///—-

*इयत्ता ९ वी*

(१)प्रथम क्रमांक – समृध्दी अभय कुमावत (मॉर्डन गर्ल्स हायस्कूल)

(२)द्वितीय क्रमांक – पूनम राहुल पाटील (———–//——–)

(३)तृतीय क्रमांक – A – प्रतीक्षा गणेश घाडगे (डॉ.वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय.

(४)तृतीय क्रमांक – B – अमृता जोशी .( अरण्येश्वर इंग्रजी माध्यमिक )

     उत्तेजनार्थ

(११ – प्रती ₹१,००० रोख + स्मृती चिन्ह + प्रशस्ति पत्र)

(१) पारस प्रशांत भिसे (मॉर्डन हायस्कूल गणेशखिंड)

(२) श्रावणी सिद्धार्थ हिवाळे (———-//———)

(३)सोनी ईश्वर प्रजापती .(डॉ.वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय)

(४)शांभवी स्वप्नील बाराहत्ते.(नारायणराव सणस विद्यालय )

(५) समृध्दी बिराजी ऐवळे.( नु.म. वि.मुलींची प्रशाला)

(६) स्वरूप विशाल भागवत (नू.म. विं.मुलांची प्रशालां)

(७) दिव्या विनोद बिराजदार

(मॉर्डन गर्ल्स हायस्कूल)

(८) प्राजक्ता हनुमंत महामुनी

( प्रियदर्शनी माध्यमिक विद्यालय)

(९) ओंकार मुळे (विमलाबाई गरवारे विद्यालय)

(१०) ओंकार राजू शिंनगारे (आयडीयल इंग्लिश मिडीयम)

(११) श्रुती विक्रम देसाई ( अहिल्यादेवी )

———————————————————-//——

*इयत्ता आठवी*

प्रथम क्रमांक  -1  स्वरा प्रशांत शिंदे अभिनव एज्यु.सोसा.अंबेगाव

द्वितीय क्रमांक 2 – श्रेया योगेश नाबगे हुजूरपागा लक्ष्मी रोड

त्रुतीय क्रमांक – अ 3 सिद्धी महेश देवाळे नुमवी मुलींची

त्रुतीय क्रमांक – ब 4 रोहन बापुराव जाधव आयडियल इंग्लिश स्कूल

*उत्तेजनार्थ*

(११ – प्रती ₹१,००० रोख + स्मृती चिन्ह + प्रशस्ति पत्र) 

1 श्रद्धा किशोर दिक्षीत प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल

2 दिव्या जयवंत राऊत ज्ञानेश माध्यमिक स्कूल

3 तनुजा शिवाजी तांबोळकर हिरामण बनकर माध्य विद्यालय

4 व्योमेश मिलिंद करंदीकर अरण्येश्वर इं मे स्कूल

5 अस्मिता संतोष रोकडे अरण्येश्वर ”  “

6 तनुश्री उत्तम व्हनकरे आपटे प्रशाला

7 नम्रता प्रवीण उबाळे सनब्राईट विद्यालय

8 अक्षरा राजेश तोळबंधे अहिल्यादेवी गर्लस हायस्कूल

9 किर्ती कैलास बिडवे माॅडर्न हायस्कूल

10 समीक्षा संतोष नागवडे    मुक्तांगन इं मि स्कूल

11 श्रेया संतोष भुजबळ नुमवी मुलींची.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *