पुणे- जनता महागाईमध्ये होरपळती आहे, राष्ट्रीय बँका लुटल्या जात आहेत, महीला राष्ट्रीय खेळाडू आक्रोश करीत आहेत तर मणीपुर हिंसाचाराने जळत आहे अशा प्रसंगी कर्तव्यविमूख होऊन बेमुर्तपणे दुर्लक्ष करणारे केंद्र सरकार हे असंवेदनशील व अमानुष असल्याचेच द्योतक असल्याची संतप्त टिका जेष्ठ काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांनी “सामाजिक सलोखा व सदभावना पंधरवडा समारोप” प्रसंगी केली.
राजीव गांधी स्मारक समिती माध्यमातुन गोपाळदादा तिवारी यांचे पुढाकाराने (प्रदेशाध्घ्यक्ष नाना पटोले यांचा जन्मदिन ते मा राहुलजी गांधी यांचा जन्मदिन) असा दि ५ जुन ते १९ जून पर्यंत राबवत असलेल्या ‘सामाजिक सलोखा पंधरवड्यातुन’ स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, राष्ट्रीय नेत्यांचे हौत्यात्म व योगदान, ७० वर्षातील देशाचा विकास, आजतागायत साधलेली संविधानीक राष्ट्रीय एकात्मता सांगितली कारण ही वास्तवता आहे… तर दुसरी कडे २०१४ नंतर देशांतर्गत बिघडलेली परिस्थिती, प्रचंड वाढती महागाई, देशावरील वाढते कर्ज, राष्ट्रीय संपत्तीची लुट, घटते रोजगार इ बाबतची वास्तवता दर्र्शत माहीती या पंधरवड्यात दिली गेली. देशा समोरील मुलभूत प्रश्न व जबाबदारीं पासून विद्यमान सरकार हे पळ काढत असून, ‘ज्वलंत समस्यांवरील लक्ष विचलीत करण्यासाछीच’, सामाजिक तणाव निर्माण करण्याचा निंद्य प्रयत्न सत्ताधारी भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘कथित हिंदुत्वाचा’ आधार घेत, सामाजिक दुही माजवण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असुन, देशात नाहक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत, सामाजिक स्वास्थ्य व शांतता बिधडवण्याचा प्रयत्न चालू आहे. या पार्श्वभूमिवर पुणे शहरात “सामाजिक व सदभावना पंधरवडा” मध्ये शहरातील विविध भागांत, वस्त्या व सोसायटी येथे एकुण ९ कॅार्नर मिटींग्जचे (बैठकांचे) आयोजन केले गेल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. भाजपा आ. नितेश राणे पुण्यात येऊन लव्ह जिहादच्या नावावर मोर्चे काढून परिस्थिती बिघडवण्याचे काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात भीती, संशय व दुहीचे वातावरण होऊ नये म्हणून हा उपक्रम राबवत असल्याचे स्मारक समिती सदस्य जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी सुभाष थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले..! संयोजक श्री योगीराज नाईक यांनी स्वागत- प्रास्ताविक केले.. संयोजिका सौ ताई कसबे यांनी सुत्र संचालन केले व संतोष पाटोळे यांनी आभार प्रदर्शन केले..! हरीदास अडसूळ, दिपक ओव्हाळ, धनंजय भिलारे यांची देखील भाषणे झाली..
या प्रसंगी, स्मारक समिती जेष्ठ सदस्य रामचंद्र शेडगे, शाम काळे, श्री परदेशी, योगेश घाग, हरीश यादव, शाम काळे, स्वप्नील नाईक, विजय हिंगे, सद्दाम शेख, लालसाहेब शाह इ कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व परीसरातील स्थानिक नागरीक उपस्थित होते.
‘सामाजिक सैहार्दता पंधरवडा’… नाना पटोले यांचे जन्मदिनी ५ जुन रोजी प्रथम बैठकीचे आयोजनाने सुरू झाला.. १) नारायण पेठ संपर्क कार्यालय, २) ॲड फैयाज शेख यांचे जंम रोड वरील गणेशोत्सव मंडळ, ३) भोला शेठ वांजळे यांचे मंडई परीसरातील कार्यालय, ४) सुभाष शेठ थोरवे यांचे शाहुचौक गणेशोत्सव मंडळ. शुक्रवार पेठ, ५) हॅाटेल स्वीकार कट्टा, नळ स्टॅाप, कोथरूड, ६) सचिन भोसले यांचे कार्यलय, शांती नगर, येरवडा – विश्रांतवाडी परीसर, ७) धनंजय भिलारे यांचे निवासस्थान, शिंदे आळी, ८) काँग्रेस अल्पसंख्यांक नेते जावेद निलगर यांचे निवासस्थान, पांडव नगर, शिवाजी नगर, ९) योगिराज नाईक – सौ ताई कसबे, संजय नगर वस्ती, सहकार नगर, पुणे.. अशा ९ ठीकाणी सामाजिक सलोखा – सदभावना प्रबोधनपर बैठका सत्र यशस्वीपणे साकार झाल्याचे संयोजक गोपाळदादा तिवारी यांनी सांगीतले.