न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते- कोणाला म्हणाले अजित पवार?

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

पुणे- पुण्यामध्ये नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या युवकाने अत्यंत भडक आणि वादग्रस्त विधाने करीत हिंदू समाजावर टीका केली होती. त्यावरून वादंग निर्माण झाला असून भाजपने शरजीलच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि जितेंद्र आव्हाड यांनी शरजीलचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी एल्गार परिषद भरविण्यामागे मुख्य भूमिका निभावणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधत नाराजी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले, शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  आता गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबत महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत मात्र एल्गार परिषदेला परवानगी देताना आता तिथं कोण येणार? काय बोलणार? याची आम्हाला माहिती असते का असे अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  लसीचे नीट वाटप करा;आम्ही राजकारणाचे उत्तर जरूर देऊ- प्रकाश जावडेकर