आज जागतिक महिला दिन…. महिला दिन म्हटलं की स्रीयांच्या सबलतेविषयीची चर्चा केली जाते. स्री सबल झाली म्हणजे काय? असं विचारलं तर स्री शिकली पाहिजे, ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, तीचा समाजात सन्मान झाला पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक मिळाली पाहिजे, ती आर्थिक सबल झाली पाहिजे असे उत्तर आपल्याला दिले जाते आणि त्यात वावगे काहीच नाही.परंतु, या सर्व गोष्टींसाठी आवश्यक असणाऱ्या स्रीयांच्या मानसिक सबलतेविषयी मात्र कोणीच बोलत नाही. वर उल्लेख केलेल्या सबलीकरणाचे मूळ हे तिच्या मानसिक आणि आपसुकच शारीरिक सबलतेमध्ये आहे याचा विसर आपल्याला पडतो….
खरं तर निसर्गाची सुरुवात ही पुरुष आणि प्रकृती पासून झाली. त्यातली प्रकृती म्हणजे ‘ती’ (स्री) आहे. त्याच्यामुळे सृजन हे आहे ते तिच्याकडून येतात. काहीही बनवायचं असेल तर प्रकृती महत्त्वाची असते. सृजन ही नैसर्गिक रित्या तिच्याकडे असते. ती प्रेमळ आहे, तिच्यामध्ये ममत्व आहे आणि हे सर्व जर योग्य पद्धतीने वापरले गेलं तर सगळ्यांचे नंदनवन होऊ शकते हा स्री म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण कुठल्याही आजाराचं मूळ हे मनामध्येच आहे.
आपल्या संस्कृतीमध्ये स्रीला शक्ती म्हंटलं आहे. मग ती अबला कशी? हा प्रश्न मला कायम पडायचा. परंतु, मधल्या काळात जे काही संस्कार होत गेले, त्याचा संदर्भ घेतल्यानंतर उलगडा झाला. मधल्या काळात स्वाऱ्या झाल्या, पतन झाले आणि त्यातून त्याचे संदर्भ बदलले. त्या मधल्या काळात स्रीला बंधनात अडकवले गेले. परंतु बंधनं कशासाठी होती कारण तिच्यावर अत्याचार वाढले होते. तिला पळवून नेलं जात होतं, तिला बाटवलं जात होतं. हा शेकडो वर्षांचा काळ होता. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी ती मुक्त होती. तीला स्वातंत्र्य होतं. सर्वांप्रमाणे मुलींनाही तितकच सगळ्याचं शिक्षण दिलं जायचं. मग ती प्राचीन शास्त्राची नवीन ओळख करून देणे असेल किंवा अन्य काही. प्राचीन शास्त्रात जे दाखले सापडतात ते हेच सापडतात की तीला समानतेची वागणूक होती. तिला तितकंच महत्त्व होतं. मग हे गेले कुठं? तिच्यावर ही स्थिती का आली? तर, त्यासाठी मी वर म्हटल्याप्रमाणे मधला काळ हा महत्त्वाचा आहे. तिची शेकडो वर्षे गुलामगिरीत गेली. त्याच्यामध्ये तिला वाचवण्यासाठी तिला सांभाळण्यासाठी तिच्यावर तिच्यावर बंधने घातली गेली. याचा अर्थ प्राचीन शास्त्र तसं सांगत नाही. पण आता कालावधी बदलला आहे. आता आपण गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत. मग तो पूर्वीचा काळ पूर्वीचा आला पाहिजे. जे आपल्याला शास्त्र म्हणून दिले गेले ते स्री आणि पुरुष दोघांनाही समानच दिले गेले आहे.
स्री ही कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वाही आहे. मग काय तर आम्ही ऊर्जेचा विचार करतो. स्री ही खरं तर देणारीच आहे. ती प्रेमळ आहे पण त्याचबरोबर ती भावनिक आहे. या सगळ्याचं तिला संतुलन साधता आलं तर त्याचा तिला तिच्या आरोग्यासाठी उपयोग होईल आणि पर्यायाने कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्यासाठीही त्याचा उपयोग होईल. स्री ही भावनिक असल्यामुळे ती वेगवेगळ्या गोष्टी तिच्यामध्ये साठवत जाते. तीचा मूळ स्वभाव काहीतरी छान असतो. परंतु, कोणीतरी तीच्याशी चुकीचं वागलं किंवा तिला फसवलं गेलं तर त्यातून काहीतरी घडतं. अशा अनेकांशी संपर्क येऊन जे अनुभव येतात त्या विचारांचा परिणाम तिच्या संपूर्ण शरीरावर होत असतो. अशा अनेक गोष्टी साठत जातात आणि ह्या गोष्टी शरीराच्या निरनिराळ्या चक्रांमध्ये, साध्यांमध्ये साठत जातात. आमच्याकडे अनेकजण येतात ज्यांना ‘फ्रोजन शोल्डर’चा त्रास असतो. त्यावेळी त्यांना घरात काही त्रास आहे का? असं विचारलं तर त्याचे उत्तर होय असेच असते.
मुलांच्या बाबतीत स्रीया खूप जास्त चिंतेत असतात त्यावेळी कुठलातरी खांद्यामध्ये वेदना होत असतात. त्याठिकाणी साठवली जाते आणि तो ‘लॉक’ व्हायला लागतो. वेगवेगळे विचार तिच्या मनात सुरू असतात. हे करायचं आहे, ते करायचं आहे असं मनात घोकत राहतो. त्यामुळे सतत ऊर्जा निर्माण होत राहते आणि ती वापरली गेली नाही की ब्लॉक होते. जसा विचार आपण करतो तसं आपलं शरीर तयारी करतं. स्रीया भाव-भावना मनामध्ये साठवून ठेवतात. त्या चुकीच्या गोष्टी साठवायच्या नाहीत. म्हणजे एखादी घटना घडते त्या घटनेचा विचार हा त्रयस्थपणे करायचा असतो. उदाहरणार्थ लहानपणापासून एखाद्या व्यक्तीशी आपले चांगले संबंध आहेत परंतु, जर काही भांडण झालं तर ते भांडण आपण मनामध्ये साठवून ठेवतो. त्या व्यक्तीची आठवण आली तर आपल्याला तेवढेच आठवते. समजा कोणी फसवल असेल तर त्यातून असंही घडू शकतं हा एक आपल्याला अनुभव मिळाला. पुढच्या वेळी त्याच्या अगोदरच काळजी घेणे ही शिकवण त्याच्यातून मिळते. जर मी ते मनातून पुसून टाकलं आणि चांगल्या आठवणी लक्षात ठेवल्या तर मला त्यातून सकारात्मकता मिळणार आहे . जेव्हा केव्हा ती व्यक्ती समोर येईल तेव्हा मी हसून बोलणार. मागील वेळी त्या व्यक्तीशी व्यवहार करताना मला जो काही अनुभव आला तो ज्ञानाचा भाग म्हणून मी घेणार, असा विचार करण्याची खरंतर आवश्यकता आहे.
स्रीया बहुतेक वेळा सर्व वाईट गोष्टींची आठवण ठेवतात आणि त्यामुळे चुकीची ऊर्जा शरीरामध्ये साठत राहते. आणि त्यातून त्या खंगतात आणि त्यातून सांध्यांचे प्रश्न निर्माण होतात. दिवसभर शारीरिक कष्ट आपण करतो आणि रात्री झोपतो. त्यामुळे खर्च झालेली ऊर्जा झोपे मध्ये भरून काढली जाते. हे केव्हा घडते जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते तेव्हा. त्यामुळे डोके शांत केले पाहिजे.
निरामय मध्ये स्वयंपूर्ण उपचाराच्या माध्यमातून आपण तेच सांगतो की काय हवं त्याचा विचार करा. आत्तापर्यंत जे घडून गेले ते घडून गेलं. ते तुम्ही बदलू शकता का? नाही ना? मग सोडून द्या. कुठलीही घटना घडते ती तुम्हाला शिकवण्यासाठी घडते. त्यातून ज्ञान घ्या आणि ती घटना फेकून द्या. आपण शाळेत शिकत असताना पुस्तके साठवून ठेवत नव्हतो. परीक्षा झाली की पुस्तके विकायचो त्यातले ज्ञान साठवून ठेवायचो. तसेच एखादी घटना घडते तो एक धडा आहे. त्यातून मला काय कळलं, काय मिळालं तेवढेच घ्या आणि ती घटना फेकून द्या. मनात चुकीचं किंवा नकारात्मक बोलायचं नाही कारण त्यातून नकारात्मक स्पंदन नर्माण होतात तीच स्पंदनं वास्तूमध्ये साठून राहतात आणि सतत त्याच्या प्रभावाखाली तुम्ही घरात असता. घरात आल्यानंतर माणसाचे विचार बदलतात कारण घरात आल्यानंतर घरामध्ये ज्या ज्या व्यक्ती आहेत ते जे बोलतात ती स्पंदनं वास्तूत साठून राहतात.
निरामयच्या उपचारामध्ये आपण सकारात्मक ऊर्जा देत असतो. आपण विचार बदलायला सांगतो. त्याचे अनुभव लोक सांगतात कारण त्यांनी त्या कालावधीत नकरात्मक विचार निर्माण केलेले नसतात. आत्ता जे घडत आहे ते घडू द्यात. कारण त्याला आपण काही करू शकत नाही. पण तुम्हाला जे हव आहे, तुमची जी अपेक्षा आहे ती आतमध्ये कुठे तरी निर्माण करा आणि ती ठेवा. आत्ता जरी परिस्थिती विपरीत असली तरी ती परिस्थिती बदलली पाहिजे असा सकारात्मक विचार मला करायला पाहिजे असा याचा निश्चय करणे आवश्यक आहे.
कुठल्याही पद्धतीचं सबलीकरण असेल, मग ते शारीरिक असो, आर्थिक असो, कौटुंबिक असो अथवा सामाजिक असो त्याचं मूळ हे विचारच आहे. ज्यावेळी आपलं कुटुंब स्वस्थ असं म्हणतो त्यावेळी सर्वांना धरून ठेवण्याचा धागा हा स्त्रीच आहे. ज्या घरामध्ये स्री असते तिथे ओलावा, प्रेम असतं. जिथे स्री नाही तिथे कोरडेपणा नेहमी जाणवतो. त्यामुळे सगळ्यांना विणणारा धागा ‘ती’ आहे आणि ‘ती’ योग्य असेल त्यावेळी संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य चांगले राहते. म्हणजेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा स्त्रोत हा मुख्य स्रीच आहे.
शरीराची स्वच्छता आपण रोज करतो परंतु मनाची स्वच्छता करत नाही म्हणून आजार वाढले आहेत. आजार वाढण्याचे ते एकमेव कारण आहे. त्यामुळे ते साठत राहतं आणि मग शरीरावरपण परिणाम करतं. त्यामुळे दररोज शरीराबरोबरच मनाचीही स्वच्छता करायची आहे. दिवसाला जे जे काय घडलं त्याची झोपण्यापूर्वी एकदा सगळ्याची स्वच्छता करणे, चुकीच्या गोष्टी सगळ्या काढून टाकायच्या ,चांगल्या गोष्टीं मनामध्ये ठेवायच्या आणि आपल्याला काय हव आहे ते चित्र पूर्ण बघायचं हा विचार जरी रोज केला तरी आपण त्या दिशेने जाणार आहोत.
निरामयच्या माध्यमातून हेच आपण सर्व करत आहोत. बारा वर्षांपूर्वी सुरू करताना हाच हेतू होता की प्राचीन शास्त्र लोकांपर्यंत पोहोचावं. जेव्हापण कुठलाही विचार मांडतो किंवा उच्चारतो तशीच स्पंदने आणि ऊर्जा आपल्या देहामध्ये साठत असते. स्री ही भावनिक असल्यामुळे तिची स्पंदनं सतत सुरू असतात. अनेक विषय अनेकांबद्दलचे विषय ती साठवत असते त्यामुळे ती कायम भरलेली असते. ज्या ज्या ठिकाणी ती हे विचार साठवत जाते तसा तो प्रत्येक विचार हा वेगवेगळ्या चक्रांमध्ये साठत जातो. व्यवसायिक किंवा आर्थिक ताण असेल तर तो आज्ञाचक्र बिघडवतो. अशा विचारांनी डोके दुखायला लागतं, डोळ्यावरती ताण येतो. कुटुंबाचा ताण येतो तेव्हा छातीवर दाब येतो. अपमान झाला, अवहेलना झाली, कोणी कमी लेखलं तर ते विशुद्धचक्रावर येतं. त्यामुळे तत-पप व्हायला लागते, आत्मविश्वास जातो, तुम्हाला बोलता येत नाही, थायरॉइड सारखे प्रश्न निर्माण होतात. परीक्षा किंवा मुलाखतीसाठी जायचं असेल तर त्याचा परिणाम पोटावरती होतो. तो शारीरिक आजार वाटत असला तरी तो मानसिक आजार असतो. एकदम एखादी वाईट बातमी कानावर पडली तर त्यावेळेस कमरेखालचे त्राण निघून जाते. असा आघात ज्यावेळेस होतो तेव्हा मूलाधार चक्र कमकुवत करतो. असे वेगवेगळे विचार वेगवेगळ्या चक्रामध्ये अडकत असतात. तुम्ही स्त्री असल्यामुळे भावनांची आंदोलने खूप आहेत आणि ते जसजसं साठतं तिथे तिथे शारीरिक परिणाम व्हायला लागतात.
निरामयच्या स्वयंपूर्ण उपचार म्हणजे तुम्ही साठवलेली चुकीची ऊर्जा स्वच्छ करणे. मग ती स्वच्छ करत असताना हा विचार महत्त्वाचा असतो की नवीन साठवायचं नाही. त्यासाठी त्याबरोबर स्वयंपूर्ण उपचार घेतले तर जन्मापासून आजपर्यंत जे साठवलं ते स्वच्छ होऊन जाईल. नकारात्मक विचार तुमची ऊर्जा शोषून घेतात आणि तुमची शारीरिक ताकद कमी होऊन जाते. स्वयंपूर्ण उपचार म्हणजे शरीराला आणि मनाला लागणाऱ्या उर्जेचं संतुलन करण्याची प्रक्रिया आहे. त्याच माध्यमातून गेल्या १२ वर्षांमध्ये आम्ही हजारो स्रीयांना मानसिकरित्या सबल करू शकलो यांचे मनस्वी समाधान आहे.
डॉ.अमृता योगेश चांदोरकर
संचालक- निरामय वेलनेस सेंटर