Supriya Sule : निवडणूक आयोगाने(Election Commission) दिलेला निर्णय आम्हाला अपेक्षितच होता. जे शिवसेनेबरोबर(Shiv Sena) केले, तेच आमच्याबरोबर होईल; याची आम्हाला कल्पना होती. शरद पवार(Sharad Pawar) यांनी अनेकदा शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी ६० व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(NCP) उभा केला. आता पुन्हा आम्ही पक्ष उभा करू. सर्वोच्च न्यायालयात(Supream Court) जाऊ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार(Sharad Pawar) यांचाच आहे, हे पूर्ण देशाला माहीत आहे. पण काही अदृश्य शक्तींनी(invisible forces) आमच्याकडून पक्ष काढून घेतला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी मंगळवारी येथे दिली.(The hand of invisible forces behind all this)
निवडणूक आयोगाने उद्यापर्यंत आम्हाला नव्या पक्षासाठी तीन नावे आणि तीन चिन्हे देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे आम्ही चर्चा करून ते निवडणूक आयोगाकडे देऊ. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे वाचन झाल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.
विधानसभेत अपात्र आमदार प्रकरणी काय निर्णय होईल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, की निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काय येईल? हे वेगळे सांगण्याची गरज नाही. जे शिवसेनेबाबत झाले, तेच आमच्याबाबतही होईल.