डॉक्टर पतीने डॉक्टर पत्नीचे या कारणावरून कापले चाकूने केस

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- बहिणीच्या लग्नाला गावी जाण्यासाठी विचारणा केल्यानंतर डॉक्टर पतीने रागाने डॉक्टर पत्नीवर चाकूने हल्ला करून चाकूने केस कापल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी भागात उघडकीस आली आहे. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला असून ट्याला अटक केली आहे.

रवि दिगंबर धादवड (३८) असे डॉक्टर आरोपी पतीचे नाव आहे तर पल्लवी रवि धादवड असे फिर्यादी पत्नीचे नाव आहे. धानोरी, विश्रांतवाडी  येथील तिरुपती सोसायटीमध्ये डॉक्टर रवि आणि डॉक्टर पल्लवी हे दांपत्य राहण्यास आहेत. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. दोघांचा विवाह पाच वर्षापूर्वी झाला आहे. लग्न झाल्यावर काही दिवस सर्व काही ठीक होते. परंतु, त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद व्हायला लागले. परंतु, पल्लवी यांनी आई वडिलांच्या सामाजिक स्थानामुळे मारहाणीची वाच्चता त्यांच्याजवळ केली नाही.

मारहाणीचा प्रकार जास्तच वाढत चालल्यानंतर त्यांनी शेवटी नाशिक येथे माहेरी जाणे पसंत केले. आई-वडिलांनी पतीला समजावले. मुलीला पुन्हा सासरी पाठविले. फेब्रुवारी 2021 मध्ये दोघांमध्‍येही पुन्हा भांडणे झाली. त्यानंतर पल्लवी या पुन्हा माहेरी गेल्या. याच दरम्यान सासर्‍यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला पतीने पल्‍लवीलाच जबाबदार धरले.

नातेवाईकांनी पुन्हा समजुत काढून पल्लवी यांना नांदायला पाठविले. पती सोबत राहत असताना रविवारी (दि. 8) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पल्लवी यांनी त्यांच्या मुलीसोबत जेवण केले. परंतु पती हा दारू पित बसला होता.मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रवी हा पल्लवी यांच्या जवळ गेला. त्याने पल्लवी शिवीगाळ करून माझ्‍या वडिलांचा तुझ्‍यामुळेच मृत्‍यू झाल्‍याचा आराेप त्‍याने केला. यावेळी पल्लवी यांनी माझ्या बहिणीचे लग्न आहे, मी लग्नाला जाते म्हणून त्यांनी पतीला विचारणा केली.

यावरून पतीने अधिकच चिडून जात, तु कशी जाते मी पाहतो असे म्हणुन घरात त्याने लपवुन ठेवलेला चाकू काढून त्यांच्या डोक्याचे केस कापले. त्याला पल्लवी यांनी रडून विरोध केल्यानंतर त्याने त्यांच्या पाठीवर, उजव्या दंडावर चाकू मारून त्‍यांना जखमी केले.मारहाण करताना पतीच्या हातालाही चाकू लागला. पती मेडीकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेला. यानंतर पल्‍लवी यांनी घराचा दरवाजा बंद करून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लावून पोलिसांना बोलवून घेतले. पोलिस घरी आल्यानंतर त्यांनी पल्लवी यांना खासगी रूग्णालयात दाखल केले. पती डॉ. रवी याला ताब्यात घेतले .

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *