आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत:देशात विशिष्ट विचारधारेचा प्रपोगंडा फैलावताना दिसतो आहे – शरद पवार

कला-संस्कृती महाराष्ट्र राजकारण
Spread the love

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) -समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्मला आले, जसे की, गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद , राष्ट्रवाद वगैरे ! परंतू आजकाल ठराविक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. हि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे, (Nowadays, certain elements are emphasizing on the production of literature that nourishes certain ideologies, which is a wake-up call for democracy.) असे मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad यांनी pawar )उदगीर येथील 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केले.

उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे भरविण्यात आलेल्यां  95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, प्रपोगंडा साहित्य निर्मिती  ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरने ‘माईन काम्फ’  पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रपोगंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसतो आहे. साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे. साहित्य हे मुक्त असावे असे मी म्हटलो. याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला ते बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धीभेद करणारी,  ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते.

साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे. राज्यकर्ते असा प्रोपागंडा ( मतप्रचार)  थेट करीत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रोपागंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट ह्या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहेच.  कॉर्पोरेटचे छत्र हे प्रोपागंडाचे अस्त्र होऊ पाहते आहे . हे कॉर्पोरेटीकरण साहित्यात झाले , तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही. ह्या धोक्याच्या घंटेकडे मी आग्रहाने आपले लक्ष वेधू इच्छितो, असे त्यांनी नमूद केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *