पुणे शहरात कोरोनाचे वाढते संकट: महापालिकेने निर्बंध वाढवले


पुणे –पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे. बंधने पाळण्यासाठी आवाहन करूनही नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. शहरातील नवीन कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दिवसाला दोन हजारापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पुणे महापालिका खडबडून जागी झाली असून आता शहरातील निर्बंध अधिक वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमास पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः प्रतिबंध करण्यात आला आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व हॉटेल, रेस्टोरंट, बार, फूडकोर्ट, सिनेमागृह त्यांच्या आसन क्षमतेच्या 50 % क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच अँपद्वारे किंवा हॉटेलमार्फत घरपोच सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहील. हॉटेल रेस्टोरंट यांना ग्राहकांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. दर्शनी भागावर हॉटेलची एकूण आसन क्षमता आणि हॉटेलमध्ये उपस्थित ग्राहक यांची संख्या दर्शविणारे बोर्ड दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आलेआहे.

अधिक वाचा  अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा

सर्व शॉपिंग मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व शॉपिंग मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सामाजिक अंतर तसेच तेथील जागेची उपलब्धता पाहून सामाजिक अंतर पाळण्याच्या अनुषंगाने किती नागरिकांना प्रवेश देता येईल, याची निश्चिती व्यवस्थापनाने करावी, असे महापालिका प्रशासनाने आदेशात म्हटले आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लग्न समारंभ कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत करायला परवानगी देण्यात आली आहे. 16 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यत हे निर्बंध कायम राहतील, असे या आदेशात म्हटले आहे

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love