महेश मोतेवारने दगडूशेठ गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार सीआयडीने केला जप्त


पुणे- समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडनचे संचालक महेश मोतेवार यांनी शेतकरी आणि इतर गुंतवणूकदारांची फसवणूक करुन घेतलेल्या पैशातून दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) जप्त केला आहे.  

 समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या आमिषाने देशभरातील गुंतवणुकदारांना तब्बल २ हजार ५१२ कोटींचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने जप्त केली होती. याप्रकरणी मोतेवारला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. ठेवीदारांकडून घेतलेल्या पैशांमधून मोतेवार याने २०१३ मध्ये दगडुशेठ गणपतीला सोन्याचा हार, त्रिशुळ, परशु असे ६० लाख ५० हजार रुपयांचे दीड किलोचे दागिने अर्पण केले होते. सीआयडीने मोतेवार याला अटक केल्यानंतर तपासात ही बाब समोर आली होती.

अधिक वाचा  अपहरण झालेल्या वकिलाचा ‘दृश्यम’ चित्रपटाच्या स्टाईलने खून

या हाराची किंमत तब्बल 58 ते 60 लाख रुपये इतकी असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून संबंधीत सोन्याचा हार “सीआयडी’कडे सुपुर्द करण्यात आला आहे

 राज्याच्या विविध भागांमध्ये शेळीपालन तसंच शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवून मोतेवारने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्याच्या याच कारनाम्यामुळे राज्याच्या विविध भागांत त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. महेश मोतेवार सध्या ओरिसा कारागृहात आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करत आहे.

 महेश मोतेवारने केलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. त्याने गुंतवणूकदारांना फसवून कुठेकुठे पैशांची गुंतवणूक केली, याचा शोध घेणं सध्या सुरु आहे. याच दरम्यान आम्हाला एक फोटो सापडला ज्यामध्ये त्याने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला एक सोन्याचा हार अर्पण केल्याचं दिसत होतं. त्यानुसार हा हार आज जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love