#Shriram Temple: श्रीराम मंदिर तर झाले; आता पुढे काय?

Shriram Temple Ayodhya
Shriram Temple Ayodhya

Shriram Temple : अयोध्येतील(Ayodhy) प्रभू श्रीरामांची जन्मभूमी (Birthplace of Sri Rama) मुक्त व्हावी यासाठी झालेल्या आंदोलनाचा भूतकाळ व अभूतपूर्व चळवळीचा इतिहास हिंदू (Hindu)मनाला सतत पुलकित करत असतो. आता मंदीर उभे राहिले आहे, हजार वर्षे टिकेल एवढे ते शक्तिशाली देखील आहे. पण हे भव्य, तेजस्वी मंदिर आपल्याला काही सुचवते आहे का? भविष्यकाळासाठी काही दिशादर्शन करते आहे का?(The Ram temple was built; Now what next?)

प्रभू रामचंद्र अवतारी पुरुष होते, अशक्य असे त्यांना काहीच नव्हते. तरीही आपली पत्नी सीता हिची रावणाच्या तावडीतून सुटका करताना त्यांनी फक्त वैयक्तिक अन्याय झाल्याची भूमिका ठेवली नाही, तर सीतेवरील अन्याय हा सर्व स्त्री जातीवरील अन्याय आहे व तो कसा दूर केला पाहिजे याचे साक्षात उदाहरण घालून दिले आहे.

अधिक वाचा  देवर्षी नारद माध्यम पुरस्कारांची घोषणा : सम्राट फडणीस, प्रसाद पानसे, सूरज खटावकर -प्रशांत दांडेकर, रसिका कुलकर्णी यांना पुरस्कार जाहीर

वनवासात सामान्य वनवासी बंधुंपासुन नागर जनतेपर्यंत सर्वांशी संवाद केला, चौदा वर्षे संघटन केले व सर्वांना कर्तव्य कर्ता बनवले. सर्व समाजाला स्त्री महात्म्याचे महत्त्व पटवून दिले व नंतर रावण वध केला. उत्तर – दक्षिण भारत हा ध्येयवादाने एकात्म करून दाखवला. प्रभू रामचंद्रांच्या या भूमिकेचे, त्याचवेळी त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचे स्मरण करणे आवश्यक आहे.

तलवार, सरकार, लष्कर यांच्या माध्यमातून मिळणारे विजय आवश्यक असतात पण ते तेव्हांच चिरस्थायी ठरतात ज्यावेळी संपूर्ण समाजाने त्यासाठी आहुती दिलेली असते. रामजन्मभूमीवरील मंदिराच्या ५०० वर्षातील संघर्षाच्या इतिहासातील शेवटचा कळसाध्याय समाजाने स्वयंप्रेरणेने घडवला आहे व म्हणून तो विजय चिरस्थायी आहे, त्यामुळेच आपण म्हणू शकतो की हे मंदीर सहस्त्र वर्षे टिकणार आहे.

अधिक वाचा  आणि चौदार तळे अखेर चवदार झाले,समरसतेचे साक्षीदार झाले

देशात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत पण त्या चिरस्थायी तेव्हांच होतील, ज्यावेळी संपूर्ण समाज ती घटना आपली मानेल, त्याबद्दल अभिमान बाळगेल. हिंदूंसाठी अयोध्या राम मंदीराचा हा एक संदेश आहे.

काश्मीरमधून ३७० कलम सरकारने घालवले पण कधी तर, ज्यावेळी हिंदू समाज राजकीय परिवर्तनासाठी राजकीय हिंदू बनला त्यावेळी. म्हणून ३७० कलमाने पुन्हा कधीच डोके वर काढायचे नसेल तर नित्य जागृत असलेला हिंदू समाज हीच त्याची खात्री असेल. अशा सर्वच विजयांबाबत समाज तो विजय किती आपला मानतो यावर त्या विजयाचे चिरंजीवित्व अवलंबून आहे.

अयोध्येत उभ्या राहिलेल्या राम मंदीराचा हिंदू समाज व राष्ट्राला हा एक संदेश आहे. असेच अनेक संदेश हे राम मंदीर देत आहे ते पुढील लेखांमधून पाहूयात.

अधिक वाचा  मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा

–  सुनील देशपांडे

मोबाईल क्र. : ९४२०४९५१३२

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love