आठवडा उलटूनही आमदार पुत्रावर कारवाई नाही:पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव ?

क्राईम राजकारण
Spread the love

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी झालेल्या कथित गोळीबार प्रकरणी त्यांनी फिर्याद दाखल केलेल्या आरोपींना पोलिसांनी काही तासांतच पकडले. परंतु, तपासानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. अण्णा बनसोडे यांनी आरोपी हल्लेखोराला शिवीगाळ केल्याचे रेकॉर्डिंगही पुढे आल होते. एवढंच नाही तर हल्लेखोराच्या कंपनीत जाऊन आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे याने साथीदारांसह तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र, आठवडा उलटूनही अद्याप आमदार पुत्रावर कारवाई का झाली नाही असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान, आयर्नमॅन अशी इमेज असलेले पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणखी एक अपहरण आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला. परंतु सात दिवस झाले तरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि त्यांच्या पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेला पकडण्यात यश आलेले नाही..

कसल्याही दबावाला न झुकणारे अशी इमेज कृष्णप्रकाश यांनी बनवली आहे. त्यांचे प्रसार माध्यमातले चाहते ही इमेज जपण्यासाठी कायम धडपडत असतात. परंतु इथे आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे त्यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात झालेली त्यांची इमेज, आमदार पुत्रावर होत नसलेल्या कारवाईमुळे धोक्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *