पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे – फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मागणी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–पुरंदर येथील विमानतळ पुन्हा चाकण येथे आणावे अनेक परदेशी कंपन्या गुंतवणूक करण्यास पुढाकार घेतील,अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

पूर्वी चाकण येथे कार्गो विमानतळ होणार होते त्यामुळे अनेक मोठ्या उद्योगांनी चाकण येथे गुंतवणूक केली . कारण चाकणच्या आजूबाजूच्या परिसरात तळेगाव रांजणगाव पिंपरी चिंचवड इत्यादी औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत.  तसेच तळेगाव सुद्धा चाकण पासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर असल्याने या भागात विमानतळ आल्यास नक्कीच परदेशी कंपन्या आकर्षित होऊन  महाराष्ट्रातील गुंतवणुकीत भर पडून त्याचा उद्योग क्षेत्राला मोठा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आजही या भागातील उद्योग क्षेत्राला मुंबई विमानतळाशिवाय पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेक उद्योग येण्यास अनुउत्सुक आहेत.

सरकारच्या सतत बदलत्या धोरणामुळे अनेक परदेशी उद्योग द्विधा मनस्थिती मध्ये असून योग्य पर्याय मिळाल्यास महाराष्ट्र मध्ये गुंतवणुकीस मोठी संधी निर्माण होऊ शकते. या सबंध औद्योगिक पट्ट्यात पन्नास ते साठ हजार कंपन्या असून ऑटोमोबाईल, फार्मासिटिकल, इलेक्ट्रिकल, इंजीनियरिंग , केमिकल आणि विविध मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत. मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते.  परंतु निर्यातीचा खर्च पाहता कंपन्यांना सध्या या ठिकाणी परवडत नसल्याचे दिसून येते . फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे चाकण येथे विमानतळ आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज प्रसिद्ध पत्राद्वारे सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *